Explanation by Alka Lamba : अदानी प्रकरणावरून राजकीय वाद इतका वाढत चालला आहे की विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्येही मतभेद सुरू झाले आहेत. अदानी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका पूर्णपणे वेगळी ठेवली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याची आवश्यकता नव्हती, असेही पवारांनी म्हटलं होतं. पण त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टिका केली. (Congress leader's 'U-turn' on criticism of Sharad Pawar over Adani)
अलका लांबा यांनी टिका करत थेट शरद पवार ((Sharad Pawar) यांच्यावरच निशाणा साधला होता. "स्वार्थी आणि घाबरलेले लोक हुकुमशाही सत्ताधाऱ्यांचे कौतुक करीत आहेत, देशातील जनतेच्या प्रश्नांची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडवलशाही चोरांपासून ते या चोरांना वाचविणाऱ्या चौकीदारांशी ते एकटेच लढत आहेत," असे टि्वट अलका लांबा यांनी केलं होतं.
त्यांच्या या टिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्यामध्ये ट्विटर वॉर सुरु झालं.अलका लांबाच्या टि्वटला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. "अलकाजी, तुम्ही शरद पवार यांची मुलाखत लक्ष देऊन ऐका. शरद पवार हे वरिष्ठ नेता आहेत. त्यांचे विचार वेगळे असू शकतात. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याविषयी कुणीही बदनामीकारक विधान करावे. तुम्ही शेअर केलेल्या फोटोसारखे फोटो आम्ही तुम्हालाही पाठवू शकतो. तुमचे नेते हे घाबरलेले आणि स्वार्थी आहेत, हे सांगण्याचे कष्ट तुम्ही घ्याल का? असा सवाल केला.
अलका लांबा यांचे स्पष्टीकरण
अलका यांच्या विधानावरून भाजपने त्यांना घेरले असता त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. शरद पवार यांच्यासंदर्भातील त्यांच्या ट्विटवर अलका लांबा म्हणाल्या की, मी जे काही बोलले ती काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही. पक्षाची अधिकृत भूमिका त्यांच्या पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून येते. पण "मी काँग्रेस कार्यकर्ता आहे, माझे ट्विट आणि माझ्या वैयक्तिक ट्विटर हँडलवर माझे स्वतंत्र विचार आहेत. त्यांची जबाबदारी आणि त्यावर उत्तर देणे माझी जबाबदारी आहे. पक्ष लोकशाही आहे आणि प्रत्येकाला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे." असे लांबा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.