Sharad Pawar News : ‘अदानी’ बाबत पवारांच्या भूमिकेवरुन काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये Twitter वॉर रंगले..

NCP Suraj Chavan attacks BJP alka lamba : अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो ट्विट करत टीका केली.
Rahul Gandhi, Sharad Pawar
Rahul Gandhi, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

NCP Suraj Chavan attacks BJP alka lamba : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेऊन काँग्रेसची आणि राहुल गांधी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडियावर टि्वट वॅार रंगले आहे.

गौतम अदानी यांच्या उद्योग समूहावर आरोप करणाऱ्या हिंडनबर्ग संस्थेचे नाव कधी ऐकलेले नव्हते, असे सांगतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) स्थापन करण्याची आवश्यकता राहिली नाही, असेही पवारांनी नुकतेच नमूद केले आहे.

शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो ट्विट करत टीका केली.

"स्वार्थी आणि घाबरलेले लोक हुकुमशाही सत्ताधाऱ्यांचे कौतुक करीत आहेत, देशातील जनतेच्या प्रश्नांची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडलशाही चोरांपासून ते या चोरांना वाचविणाऱ्या चौकीदारांशी ते एकटेच लढत आहेत," असे टि्वट अलका लांबा यांनी केलं आहे.

Rahul Gandhi, Sharad Pawar
MNS News : राष्ट्रवादी भाजपची बी टीम ; अदानी प्रकरणावरुन मनसेचा गंभीर आरोप

अलका लांबाच्या टि्वटला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "अलकाजी, तुम्ही शरद पवार यांची मुलाखत लक्ष देऊन ऐका. शरद पवार हे वरिष्ठ नेता आहेत. त्यांचे विचार वेगळे असू शकतात. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याविषयी कुणीही बदनामीकारक विधान करावे. तुम्ही शेअर केलेल्या फोटोसारखे फोटो आम्ही तुम्हालाही पाठवू शकतो. तुमचे नेते हे घाबरलेले आणि स्वार्थी आहेत, हे सांगण्याचे कष्ट तुम्ही घ्याल का?

Rahul Gandhi, Sharad Pawar
TMC video goes viral : एक किलोमीटर दंडवत घालत तीन आदिवासी महिलांचा TMC मध्ये प्रवेश ; काय आहे प्रकरण ?

अलका लांबा यांच्या टि्वटनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "राजकारण होत आणि जाते. पण, काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांचा ३५ वर्षातील मित्रपक्ष आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री असणाऱ्यांबद्दल केलेले ट्विट आश्चर्यकारक आहे. भारतातील राजकीय संस्कृतीत राहुल गांधी घाणेरडे राजकारण करत आहेत,"

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com