New Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि जागा वाटप निश्चित करण्यासाठी काँग्रेसने मंगळवारी पाच सदस्यीय राष्ट्रीय गठबंधन समिती स्थापन केली आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक या समितीचे संयोजक असणार आहेत.
या समितीमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचाही समावेश आहे. इंडिया आघडीची बैठक सुरू होण्याच्या आधी काँग्रेसने ही समिती जाहीर केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (इंडिया) या विरोधी आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत जागा वाटप, संयुक्त जाहीर सभा आणि पुढील लोकसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती बनवणे यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
अशोक हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जनता दल (यू)चे राजीव रंजन सिंह, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही उपस्थिती लावली. तसेच पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) मेहबुबा मुफ्ती, अपना दल (के) च्या कृष्णा पटेल आणि पल्लवी पटेल आणि इतर अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक होत आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागेल आहे. त्यामुळे या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा अजेंडा ठरवणे, प्रबोधन करणे, नवीन रणनीती बनवणे, संयुक्त जाहीर सभा किंवा यासारखे असू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
(Edited By -Sudesh Mitkar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.