Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Prakash Ambedkar: "मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला चोरांसमोर मांडला तर ते त्याचं खोबरं करतील...

Prakash Ambedkar Questioned Girish Mahajan : प्रकाश आंबेडकर यांचा आरक्षणावरून महाजन आणि फडणवीस यांच्यावर हल्ला बोल
Published on

Jalgaon News : मराठा आरक्षणाची जी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यावर माझ्याकडे उपाय आहे, मात्र तो आताच्या या चोरांसमोर मंडणार नाही. ते त्याच खोबरं करतील असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केल आहे.

राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. याबाबत त्यांनी राज्य शासनाला काही कालावधी द्यावा, असे म्हटले होते. दरम्यान नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणावर चर्चा झाली आहे. त्याच वेळी या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत देखील राज्य शासनाची चर्चा सुरू आहे. ग्रामविकास मंत्री महाजन यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar
RSS News: अजित पवार गटाच्या आमदारांची नागपुरातील संघाच्या कार्यक्रमाला दांडी

याबाबत आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधला, नवीन सरकार आल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळायचा आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसे आरक्षण द्याचे हे मी त्यांना सांगेन अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली ."महाजन यांनी मराठा आरक्षणाची चर्चा व त्यावर विधाने करण्या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यात ॲडव्होकेट जनरल यांच्या विषयी घेतल्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे, असे आंबेडकर म्हणाले.

ते म्हणाले, राज्याचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोनी यांनी मराठा आरक्षणाची बाजू उच्च न्यायालयात यशस्वीपणे मांडली. परंतु, सुप्रीम कोर्टात त्यांना बाजू मांडण्यापासून का रोखण्यात आले, त्यांनी न्यायालयात हजर राहू नये असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आदेश का दिले, याबाबतचे उत्तर गिरीश महाजन यांनी अगोदर द्यावे, असे थेट आव्हान दिले.

(Edited by- sudesh mitkar )

Prakash Ambedkar
Champat Rai: 'राम मंदिर सोहळ्याला अडवाणी अन् मुरली मनोहर जोशींनी येऊ नये'; चंपत राय असं का म्हणाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com