Congress Sarkarnama
देश

Congress Setback : काँग्रेसमध्ये भूकंप, सामुहिक राजीनामा अस्त्र, पक्षांतर्गत वाद उफळला; तब्बल 17 पदाधिकारी...

Congress Crisis in Chhattisgarh : काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा अध्यक्ष बदलावरून सामुहिक राजीनामा सत्र सुरू झाले आहे.

Roshan More

Congress News : काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी उफाळली असून एकाच वेळी तब्बल 17 मोठ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये माजी मंत्र्याच्या सुनेचा देखील समावेश आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील काँग्रेस नेतृत्व हादरले आहे. जाॅइंट सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी आणि सेक्रेटरी यांच्यासह तब्बल 17 जणांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे.

राजीनामा देणारे पदाधिकारी हे माजी उपमुख्यमंत्री टी एस सिंह देव यांच्या गटातील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी उफाळल्याचे चित्रे आहे. शशि सिंह यांना सूरजपूरचे जिल्हाध्यक्ष बनवले होते. त्यामुळे टी एस सिंह देव यांचे समर्थक नाराज झाले होते. नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता शशी सिंह यांची निवड केल्याची तक्रार केली होती.

राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला वारंवार दुर्लक्षीत केले जात आहे. सन्मानाची वागणूक मिळत नाही. राजीनामा देणाऱ्यांमध्ये माजी क्रीडा मंत्री साई सिंह यांच्या सुनेचा देखील सहभाग आहे.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोरखनाथ बिहारपू, संतोष सारथी, शिवनारायण गुप्ता, सरिता सिंह, माखनलाल जयस्वाल,उषा सिंह, विमला सिंह मरावी, मलकीत सिंह गैदू आदी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीची चर्चा सोशल मीडियावर देखील रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT