

Mumbai News: मुंबईतील मुलुंड येथे सुरु असलेल्या मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन गाड्यांवर मलबा कोसळल्यानं एकाचा मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी झाले होते. ही घटना शनिवारी(ता.14) दुपारी घडली आहे. या घटनेनंतर सरकारकडून पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईतील मुलुंड येथे घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करतानाच चौकशीचे आदेश दिले होते. तसेच राज्य सरकारकडून मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च केला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. याचदरम्यान, महापौर रितू तावडे यांनी मुंबईतील मुलुंडमधील मेट्रो दुर्घटना प्रकरणी पूल बांधताना 100 टक्के निष्काळजीपणा झाला असल्याचा ठपका ठेवतानाच जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला होता.
आता या दुर्घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलूंड दुर्घटनाप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच यावेळी या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सत्यजित साळवे या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर मेट्रो पूलाच्या मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ॲाडिट करण्याचे आदेशही सरकारकडून दिले गेले आहेत.
तसेच या दुर्घटनाप्रकरणी लुई बर्गर कंपनीला 1 कोटी तर मिलन इंफ्रा कंपनीला 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचवेळी एमएमआरडीएने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 15 लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोचे काम सुरू असताना पिलरची पॅरापीट वॉल निखळून थेट खाली जाणाऱ्या रिक्षावर पडली. ही भिंत कालच बसवण्यात आली होती आणि दुसऱ्याच दिवशी ती कोसळणे हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले होते. त्यांनी घटनास्थळावरील व्हिडिओ आणि फोटोंची पाहणी केल्यानंतर हा कंत्राटदाराचा मोठा हलगर्जीपणा असल्याचं म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.