Congress Manifesto Committee  Sarkarnama
देश

Congress Manifesto Committee : काँग्रेसची 'जाहीरनामा समिती' जाहीर; महाराष्ट्राच्या एकाही नेत्याचा समावेश नाही!

Congress Manifesto Committee : लोकसभेसाठीच्या जाहीरनाम्यावर काम करणार 16 सदस्यीय समिती...

Chetan Zadpe

Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस जोरदार तयारीला लागली आहे. काल शुक्रवारी (22 डिसेंबर) काँग्रेसने 'जाहीरनामा समिती' जाहीर केली आहे. यात विशेष बाब म्हणजे यामध्ये खासदार राहुल गांधीचा समावेश नाही. सोबतच महाराष्ट्राच्या एकाही नेत्याचा या समितीमध्ये समावेश नाही. याबाबत पक्षाचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले, 'आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या अध्यक्षांनी ही समिती स्थापन केली आहे. निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्याचे काम ही समिती करणार आहे.' (Latest Marathi News)

काँग्रेसने ट्विटरवर (X) जाहीर केलेल्या प्रेस रिलीजनुसार, जाहीरनामा समिती पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. तर या टी. एस. सिंहदेव यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी असेल. यात एकूण 16 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सिद्धारामय्या, शशी थरूर, जयराम रमेश या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांसह प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. सोबतच आनंद शर्मा, गायखंगम, गौरव गोगोई, प्रवीण चक्रवर्ती, इमरान प्रतापगढी, के. राजू,ओमकार सिंह मरकाम, रंजीत रंजन, जिग्नेश मेवाणी आणि गुरदीप सप्पल यांचाही समावेश आहे

राष्ट्रीय समितीची स्थापन

यापूर्वी काँग्रेस पक्षाने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 'इंडिया' आघाडीत असलेल्या पक्षांसह जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी पाच सदस्यीय राष्ट्रीय समिती स्थापन केली होती. मोहन प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश -

मोहन प्रकाश यांच्या नेतृत्वाखालील समितीमध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि भूपेश बघेल यांना स्थान देण्यात आले आहे. तसेच माजी कायदामंत्री सलमान खुर्शीद आणि काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनाही या समितीमध्ये घेण्यात आले आहे. 'इंडिया' आघाडीतील मित्रपक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करण्यासठी ही समिती काम करेल.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT