Rajasthan Politics : मोदी सरकारमधील नवे कायदामंत्री अडचणीत ? मुख्यमंत्री गहलोत यांनी दिले चौकशीचे संकेत

Ashok Gehlot in Action mode : अधिकारी असताना भ्रष्टाचार केल्याचे आरोप..
Rajasthan Politics :
Rajasthan Politics : Sarkarnama

Jaipur News : राजस्थान विधानसभा निवडणुक (Rajasthan Election) तोंडावर आले असतानाच भारतीय जनता पार्टीमध्ये नवे संकट उभे राहिले आहे. मोदी सरकारमधील केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) अडचणीत सापडले आहेत. जहानपूर विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलाश मेघवाल यांनी अर्जुन राम मेघवाल यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी मेघवाल यांच्या आयएएस अधिकारी असताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबतस भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजप नेते कैलाश मेघवाल यांच्या आरोपांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, "कैलाश मेघवाल योग्य तेच बोलत आहेत, आम्ही मंत्री अर्जुन मेघवाल चौकशी करत आहोत. अर्जुन मेघवाल प्रशासकीय सेवेत (आयएएस) असताना, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते." यामुळे आता राजस्थानच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Rajasthan Politics :
Rajasthan Politics : राजस्थान काँग्रेसमधील मतभेद मिटले ? सचिन पायलटांच्या समर्थनार्थ अशोक गेहलोत मैदानात

अर्जुन मेघवाल यांचा पलटवार -

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिल्लीत माध्यमाशी संवाद साधताना सांगितले, "कैलाश मेघवाल यांना बहुधा भाजपकडून तिकीट मिळत नाही, त्यामुळे ते काँग्रेसकडे जात आहेत. कैलाश मेघवाल मला मंचावरून धमकावत होते की, मला तिकीट देणार की नाही? ? मी त्यांना स्पष्ट सांगितलं, तिकीट देणारा मी कोण, तिकीट पक्ष ठरवतो. कदाचित त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असावी. त्यांना तिकीट मिळणार नाही, असे त्यांना वाटत असावे, म्हणून ते काँग्रेसच्या सूरात सूर मिसळत आहेत. ते मंचावरून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत आहेत. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना ते माझ्यावर टीका करणे स्वाभाविक आहे."

Rajasthan Politics :
Arvind Kejariwal News : 'इंडिया' आघाडीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 'हे' तीन चेहरे ? केजरीवालांची तडकाफडकी माघार...

कैलास मेघवाल यांनी 'हा' आरोप केला होता -

भाजपने माजी मंत्री कैलाश मेघवाल यांना त्यांच्या वक्तव्याबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. खरं तर, एका कार्यक्रमात कैलाश मेघवाल यांनी फक्त आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीका केली नाही, तर काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचीही प्रशंसा केली आहे. कैलाश मेघवाल यांनी अर्जुन राम मेघवाल यांचा भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून उल्लेख केला आहे. यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.

Rajasthan Politics :
Satara BJP News : खासदार उदयनराजे भोसले यांच्या विश्वासू समर्थकावर भाजपकडून मोठी जबाबदारी

कैलाश मेघवाल म्हणाले, "मी पंतप्रधानांना सांगणार आहे की, ज्यांना तुम्ही मंत्री केले आहे, ते भ्रष्टाचारात गुंतलेले अधिकारी होते. त्यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला होता. त्यात गरीब आणि असहाय्य लोकांनाही सोडले नाही," असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com