Congress MLA news : उत्तराखंडमध्ये शनिवारी मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. राज्यातील पिथोरगड जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेस आमदार हरीश सिंह धामी यांनी गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत पार पडला.
हरीश धामी हे व्यासपीठावरून बोलत असताना त्यांनी अचानक आपल्या हातातील माईक एका व्यक्तीच्या दिशेने फेकला. त्यानंतर ते व्यासपीठावरून संबंधित व्यक्तीच्या दिशेने धावले. त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही व्यक्ती ध्वनीव्यवस्थेचे काम सांभारणारी होती. या कर्मचाऱ्याने आपला माईक बंद केल्याचा आरोप धामी यांनी नंतर केला.
धारचुला येथील काँग्रेस आमदार हरीश सिंह धामी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एकीकडे धामी हे कर्मचाऱ्यांशी वाद घालत असतानाच त्यांच्या समर्थकांनी व्यासपीठावर खुर्च्या व इतर साहित्याची फेकाफेक केली. आमदारांसह त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमस्थळ सोडल्यानंतर हा प्रकार घडला आहे.
दरम्यान, धामी यांनी या प्रकारावर बोलताना म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या निघून गेल्यानंतर बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपला माईक बंद करण्यात आला. हे योग्य आहे का? आमदार म्हणून मला बोलण्याचा अधिकार नव्हता का?, असे प्रश्न धामी यांनी उपस्थित केले. मला मतदारसंघाशी संबंधित मुद्दे मांडायचे होते, ज्यात विकासाची अपूर्ण आश्वासने आणि रस्त्यांची अवस्था यांचा समावेश आहे, असेही धामी म्हणाले.
माझ्याकडून चूक झाली तर मी ती मान्य करेन आणि माफी मागेन. मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी २०२७ ची विधानसभा निवडणूक धारचुला मतदारसंघातून लढवावी, असे आव्हान धामी यांनी दिले. पक्षाने परवानगी दिली मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, त्या मतदारसंघातून त्यांच्याविरोधात निवडणूक लढू, असेही धामी म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.