Rupali Chakankar Trademark : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो, वैयक्तिक शैलीचा केला ट्रेडमार्क रजिस्टर; वापर केल्यास कोर्टात खेचणार

Rupali Chakankar Trademark Registration, Legal Warning : संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियात केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी नाव, फोटो, ओळख, वैयक्तिक शैली आणि स्वत:ला सादर करण्याची विशिष्ट पध्दत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी केली आहे. त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणताही वापर केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी 'एक्स'वर ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझे नाव, माझा फोटो, माझी ओळख, माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे.

माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो,ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास, अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

Rupali Chakankar
महिला जिल्हाधिकारी थेट केंद्रीय मंत्र्यांना खेचणार कोर्टात? 75 लाखांची लाच प्रकरण तापले...

आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे चाकणकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

चाकणकर यांच्या या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या, "रुपाली चाकणकर, आता महाराष्ट्राला धमक्या देणे बंद करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या!" राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा आणि गरिमा जपण्याऐवजी त्या पदाचा वापर राजकीय स्वार्थासाठी झाल्याचे गंभीर आरोप झाले आणि अखेर राजीनामा द्यावा लागला. ज्या नेतृत्वाने तुम्हाला या पदावर बसवले, त्यांनीच आता या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राला उत्तर द्यावे!

Rupali Chakankar
Chhagan Bhujbal : पवार कुटुंबाचे एकत्रीकरण सोपं नाही, छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी...

ट्रेडमार्कचा दावा करता, मग कागदपत्रे दाखवा! कोणत्या ट्रेडमार्कची नोंदणी झाली? त्याचे अधिकृत प्रमाणपत्र काय आहे? संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या नियमांनुसार मंजुरी दिली? याचा पारदर्शकपणे खुलासा करा. माझ्याविरोधात बोलू नका, गुन्हे दाखल करीन, कोर्टात खेचेन अशा धमक्या देऊन जनतेचा आवाज बंद करता येत नाही. महाराष्ट्राला धमक्या नकोत, सत्य आणि पारदर्शक उत्तरे हवीत, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.