Former Lok Sabha Speaker Meira Kumar is expected to preside over a mock parliamentary session as Congress president Mallikarjun Kharge prepares a proposal against Chief Election Commissioner Gyanesh Kumar. Sarkarnama
देश

Congress plan : मीरा कुमार पुन्हा लोकसभा अध्यक्ष, खर्गे मांडणार ज्ञानेश कुमारांविरोधात प्रस्ताव; असा आहे काँग्रेसचा 'सार्वजनिक महाभियोग'चा प्लॅन

Meira Kumar, Mallikarjun Kharge, Gyanesh Kumar, Congress, mock impeachment : इंडिया आघाडीकडून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रत्यक्ष संसदेतही महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी आहे.

Rajanand More

India Alliance strategy : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीकडून दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबरला महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पण त्याआधी काँग्रेसकडून सार्वजनिक महाभियोगचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाच्या नेत्या मीरा कुमार या लोकसभा अध्यक्षपद भूषविणार आहेत.

इंडिया आघाडीकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) या आगळ्यावेगळ्या राजकीय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अभिरूप (Mock) संसद अधिवेशन भरविले जाणार आहे. या अधिवेशनासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे हे पद दिले जाणार आहे.

इंडिया आघाडीकडून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रत्यक्ष संसदेतही महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी आहे. त्याआधी अभिरूप महाभियोगच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण संविधानिक कार्यवाहीचे प्रतिकात्मक आयोजन करण्याचे नियोजन आहे. यामध्ये संपूर्ण कामकाज लोकसभेच्या दैनंदिन कामकाजाप्रमाणेच होणार आहे. कार्यवाही सुरू झाल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून मॉक महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला जाईल. ही कार्यवाही शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.

मिडिया रिपोर्टनुसार, काँग्रेसचे महासिचव के. सी. वेणुगोपाल आणि खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे वरिष्ठ नेते अभिरूप संसद अधिवेशनाची तयारी करत आहेत. हा कार्यक्रम सुरूवातीला अशोका हॉटेलमध्ये करण्याचे नियोजन होते. त्यानंतर रामलीला मैदानाचाही विचार करण्यात आला होता. पण त्याठिकाणांवर आयोजनास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अखेर खर्गे यांच्या निवासस्थानाची निवड करण्यात आली.

वेणुगोपाल यांनी काहीही झाले तरी आम्ही ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पंतप्रधान मोदी, अमित शहांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करू. पण आमचे मिशन पूर्ण होईपर्यंत शेवटपर्यंत लढू, असेही वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT