ZP Elections update : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी : रखडलेल्या ZP अन् पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार, सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब

Maharashtra ZP Elections, Maharashtra Panchayat Samiti Elections : सुप्रीम कोर्टाने गुरूवारी झालेल्या सुनावणीदरम्यान या निवडणुकांवरील स्थगिती उठविली आहे.
Maharashtra local body elections
Maharashtra local body electionsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Supreme Court Maharashtra Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आरक्षणाच्या मुद्यामुळे प्रलंबित असलेल्या २२ जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लवकरच या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाने गुरूवारी झालेल्या सुनावणीदरम्यान या निवडणुकांवरील स्थगिती उठविली आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यानं या निवडणुकांना काही महिन्यांपूर्वी स्थगिती देण्यात आली होती. आता कोर्टाच्या जुन्या आदेशांनुसार निवडणुका घ्यायचे आदेश न्यायालयानं दिले असून सध्या सुरू असलेल्या सुनावणीच्या अधीन राहूनच या निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. मात्र, कोर्टाच्या अंतिम निकालावर या निवडणुकांच्या निकालाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. कोर्टाने यापूर्वी घालून दिलेल्या अटी-शर्ती या निवडणुकीसाठी लागू असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने आयोगाला निवडणुकांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.

Maharashtra local body elections
MLC Election Result : PM मोदींकडून काँग्रेसची खिल्ली, पण नाचक्कीपासून पुन्हा विदर्भातील 'बब्बर शेर'नेच वाचविले; नेत्यांना आठवला असेल 7 वर्षांपूर्वीचा इतिहास

ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांनी राज्यातील उर्वरित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची मागणी केली होती. मात्र, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याबाबत त्यावर इतर वकिलांनी आक्षेप घेतले होते. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी लोकशाही प्रक्रिया का थांबविली जावी, अशी विचारणा करत आधीच्या आदेशानुसार अंतरिम व्यवस्था म्हणून निवडणुका घ्यावात, असे आदेश दिले.

Maharashtra local body elections
Varanasi Election news : वाराणसीमध्ये अजूनही मतमोजणी सुरूच, भाजप उमेदवाराने निकालाआधीच पराभव केला मान्य

कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये रखडली निवडणूक?

पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, मराठवाडा, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com