New Delhi : काँग्रेसने लोकसभेत युवा नेते, खासदार गौरव गोगोई यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या टीममध्ये असलेले गोगोई लोकसभेतही त्यांना साथ देणार आहे. त्यांची लोकसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील दहा वर्षानंतर यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. दहा वर्षे हे पद रिक्त होते. राहुल यांनी आपल्या पहिल्याच भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. त्यांच्या काही वक्त्यव्यांवरून वादही निर्माण झाला.
लोकसभेत राहुल गांधी यांच्यामागे गौरव गोगोई सातत्याने उभे राहत असल्याचे दिसले. तसेच लोकसभेतील विविध चर्चांमध्येही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे आता पक्षाने त्यांना उपनेतेपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. गोगोई हे आसाममधील जोरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना निवडणुकीत तब्बल 1 लाख 44 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.
गोगोई यांच्याप्रमाणे खासदार के. सुरेश यांनाही महत्वाची जबाबदारी दिली आहे. ते पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद असतील. तर मणिकम टागोर आणि मोहम्मद जावेद यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
दरम्यान, के. सुरेश हे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार होते. लोकसभेत आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच हंगामी अध्यक्ष म्हणून के. सुरेश हेच योग्य खासदार असल्याचा दावा करत काँग्रेसने एनडीएनकडून नियुक्त खासदारांवर आक्षेप घेण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.