VIDEO Donald Trump Shot At During Rally : धाड.. धाड.. धाड.. प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार अन्...

Trump rally shooting : नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रचारसभा सुरू असताना ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात आला.
donald trump
donald trumpsarkarnama
Published on
Updated on

Trump Injured In Shooting At Pennsylvania Rally : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रचारादरम्यान एकानं ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. गोळी ट्रम्प यांच्या कानाला चिटकून गेली.

यात ट्रम्प यांच्या कानाला दुखापत झाली आहे. या हल्ल्यात ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ठार केलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) हे पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात भाषण करत होते. यावेळी ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात आला.

donald trump
Donald Trump Convicted : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी दोषी

नेमकं घडलं काय?

बटलर शहरात एका प्रचारसभेत भाषण करत असताना अचानक धाड... धाड... धाड... गोळीबाराचा आवाज झाला. गोळीबारानंतर ट्रम्प कानाला हात लावत खाली झुकताना दिसले. नंतर सिक्रेट सर्व्हिसच्या जवावांनी ट्रम्प यांना घेरलं. यावेळी ट्रम्प उठले आणि हात उंचावला आणि जनतेकडे पाहून, 'अमेरिकेला वाचविण्यासाठी मी लढत राहणार,' अशा घोषणा दिल्या.

ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी लागल्यानं चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसत होते. गोळी 2 सेंटीमीटर अलीकडे लागली असती, तर ट्रम्प यांचा जीव गेला असता. गोळीबारानंतर ट्रम्प यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तर, सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी हल्लोखोराला ठार केलं. यात काही नागरिक जखमी झाले आहेत.

donald trump
Joe Biden News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भर कार्यक्रमात पाय अडखळून पडले; नेमकं काय घडलं?

हल्ल्यानंतर ट्रम्प म्हणाले, "गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी आणि यंत्रणेनं त्वरित दिलेल्या प्रत्युत्तरासाठी मी त्यांचे आभार मानतो. प्रचारसभेत मृत आणि जखमी व्यक्तींच्या कुटुंबाप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशात असं होऊ शकते, यावर माझा विश्वास नाही. मृत झालेल्या हल्लेखोराबद्दल काहीही माहिती नाही. उजव्या कानाच्या वरील भागावर गोळी लागली आहे. गोळीचा आवाज ऐकला आणि जाणवलं की गोळी त्वचेला घासून गेली."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com