Congress : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी रक्कम सापडल्यानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सोमवारी संसद आवारात काँग्रेसविरोधात आवाज उठवलाी. त्यानंतर काँग्रेसने आपले हात झटकले असून साहू यांच्या या कारनाम्यांशी पक्षाचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस व खासदार के. सी. वेणुगोपाल (KC Venugopal) यांच्याकडून पहिल्यांदाच साहू यांच्याविषयी अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना वेणुगोपाल यांनी या प्रकरणाशी पक्षाचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, याबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. याच्याशी पक्षाचाही काहीही संबंध नाही.
साहू यांच्या घरातून एवढी रक्कम कशी जप्त करण्यात आली, याचा खुलासा साहू हेच करतील. याच्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही, असे सांगत वेणुगोपाल यांनी भाजवरही पलटवार केला. काही आठवड्यांपुर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा कोट्यवधी रुपयांच्या देवाणघेवाणीविषयी बोलत असल्याचे समोर आले होते. भाजपचे माजी अध्यक्षही अशा प्रकरणात आढळले. काँग्रेसवर टीका करणारा भाजपचे भ्रष्टाचारामध्ये बरबटलेला असल्याची टीका वेणुगोपाल यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, साहू यांच्याकडे आतापर्यंत 350 कोटींहून अधिक बेहिशेबी रक्कम आढळून आली आहे. आयटी विभागाची ही देशातील आतापर्यंत सर्वात मोठी रेड मानली जात आहे. साहू यांच्या ओडिशा (Odisha) आणि झारखंडमधील (Jharkhand) अक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. आयटी विभागाने (Income Tax) 40 लहान-मोठ्या मशीनच्या माध्यमांतून पैशांची मोजदाद केली जात आहे. त्याचप्रमाणे भारतीय स्टेट बँकेचे (State Bank of India) 80 हून अधिक कर्मचारी या कामांत गुंतले आहेत.
भाजपकडून सोमवारी संसदेच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. तसेच देशभरातही ठिकठिकाणी भाजपकडून काँग्रेसविरोधात आंदोलन केले जात आहे. साहू हे काँग्रेसचे एटीएम असल्याची टीका केली जात आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.