Congress MP : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या कारनाम्यांनी संपूर्ण देश चक्रावला आहे. सलग सहाव्या दिवशी आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच असून पैशांची मोजणी थांबत नाही. आतापर्यंत 350 कोटींहून अधिक बेहिशेबी रक्कम आढळून आली आहे. आयटी विभागाची ही देशातील आतापर्यंत सर्वात मोठी रेड मानली जात आहे. एकाच कारवाईमध्ये एवढी रक्कम एकदाही जप्त करण्यात आलेली नाही.
साहू यांच्या ओडिशा (Odisha) आणि झारखंडमधील (Jharkhand) अक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास 350 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. आयटी विभागाने (Income Tax) 40 लहान-मोठ्या मशीनच्या माध्यमांतून पैशांची मोजदाद केली जात आहे. त्याचप्रमाणे भारतीय स्टेट बँकेचे (State Bank of India) 80 हून अधिक कर्मचारी या कामांत गुंतले आहेत. या छापेमारीने एकाच प्रकरणात केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे आयटी विभागाकडून सांगितले जात आहे.
आयटीकडून प्रामुख्याने बोध डिस्टिलरी प्रा. लि. या कंपनीसह साहू यांच्या विविध कंपन्या व ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. साहूंच्या मद्य उत्पादन कंपनीशी संबंधित ही छापेमारी आहे. आतापर्यंत कंपनीकडून किंवा काँग्रेस खासदारांकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
दरम्यान, आयटी अधिकाऱ्यांडून कंपनीशी संबंधितांचे जबाब घेतले जात आहेत. तसेच पैशांची मोजदाद आणि चार-पाच दिवस चालण्याची शक्यता आहे. हे सर्व पैसे ओडिशातील एसबीआय बॅंकेच्या शाखेत जमा केले जात आहेत. विशेष म्हणजे अधिकाधिक नोटा पाचशे रुपयांच्या असून नोटबंदीच्या काळातील असल्याचे सांगितले जात आहे.
'एवढा काळा पैसा कुठून आणतात?'
साहू यांचे नोटबंदीबाबतचे करणारे जुने ट्विटही सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. नोटबंदीनंतरही देशात एवढा काळा पैसा आणि भ्रष्टाचार पाहून मन व्यथित होते. मला समजत नाही, लोक एवढा काळा पैसा कुठून जमा करतात? या देशातून मुळापासून भ्रष्टाचार कोणी उखाडून टाकेल तर तो काँग्रेस पक्ष आहे, असे साहू यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावरून भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.