Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींवर कारवाईचे संकेत मिळताच काँग्रेसचं मोठं पाऊल; काट्याने काटा काढणार...

Lok Sabha Session Rahul Gandhi Manickam Tagore Om Birla PM Narendra Modi : काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Rajanand More

New Delhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणानंतर भाजपने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांकडूनही आज राहुल यांच्यावर कारवाईचे संकेत मिळाले. त्यानंतर काँग्रेसनेही काट्याने काटा काढण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनीही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह खासदार अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे. या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात चुकीची माहिती दिल्याचा दावा टागोर यांनी केला आहे.

टागोर यांनी लिहिलेल्या आरोप केला आहे की, पंतप्रधान यांनी भाषणात म्हटले की काँग्रेसने महिलांना 8500 रुपये देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर हे आश्वासन पूर्ण केले जाणार होते, असे पत्रात नमूद केले आहे. काँगेसची मतांची टक्केवारी 16 राज्यांमध्ये घसरल्याचेही पंतप्रधान म्हणाले होते. हा दावाही पत्रात खोडून काढण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसच्या काळात लष्कराकडे बुलेटप्रूप जॅकेट, लढाऊ विमाने नव्हती, हे पंतप्रधानांचे विधानही चुकीचे आहे. काँग्रेसच्या काळात मिग 29, जग्वॉर, मिराज 2000 आणि सुकोई एसयू 30 ही विमाने होती, असे टागोर यांनी म्हटले आहे.

अनुराग ठाकूर यांनीही आपल्या भाषणात काँग्रेसने लष्कराला लढाऊ विमाने दिली नाहीत, मोदी सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, असा दावा केला होता. त्यावरही काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान मोदी आणि ठाकूर यांच्या विधाने भ्रामक आहेत. त्यामध्ये तथ्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी टागोर यांनी केली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणानंतर भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज यांनी राहुल गांधींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यावर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही राहुल यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता बिर्ला भाजप आणि काँग्रेसच्या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT