Rahul Gandhi : लोकसभेतील भाषण राहुल गांधींना भोवणार? केंद्रीय मंत्र्यांकडून कारवाईचे संकेत

Parliament session Lok Sabha session Kiran Rijiju : राहुल गांधी यांनी अग्नीवीरसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
Rahul Gandhi in Parliament
Rahul Gandhi in ParliamentSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांचे पहिलेच भाषण अडचणीत आणू शकते. या भाषणातील काही मुद्यांवरून आक्षेप घेत भाजपने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यावरून अध्यक्षांकडून राहुल यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, अशी स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावार भाषण करताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी अग्नीवीर योजनेसह सरकारला विविध योजनांवरून धारेवर धरले होते. पण त्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिल्याने त्यांया कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

Rahul Gandhi in Parliament
Om Birla : संसदेत शपथ घेतल्यानंतर 'जय हिंदू राष्ट्र' म्हणता येणार नाही; लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय!

याविषयी बोलताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी अनेक बाबतीत चुकीची माहिती मांडली. त्यामुळे अध्यक्षांकडे कारवाईबाबत मागणी करण्यात आली आहे. आम्ही कारवाईची वाट पाहत आहोत. एकादी व्यक्त विशिष्ट कुटुंबातील आहे म्हणून त्यांना सूट दिली जाणार नाही.

सभागृहात कुणी आपल्या पदाचा गैरवापर करत करून दिशाभूल करत असेल त्यांची सहजासहजी सुटका होणार नाही. नियमानुसार कारवाई होईल, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सभागृहात राहुल गांधी यांच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रिजिजू यांनी आक्षेप घेतला होता.

Rahul Gandhi in Parliament
BSP Political News : 'हत्ती'चं वजन घटलं; 'बसप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार ?

राहुल गांधी यांनी तथ्यांवर आधारीत भाष्य करावे. त्यांच्याकडून अग्नीवीर, अयोध्येतील लोकांना देण्यात आलेली भरपाई याबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. त्यावर अध्यक्षांनीही राहुल यांना सभागृहात विधानांबाबत पुराव्यांनिशी बोलण्याची सुचना केली. त्यावर राहुल यांनीही आपण याबाबतची माहिती सभागृहाला देऊ, असे म्हटले होते.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com