Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Disqualified: मोठी बातमी ; राहुल गांधींची खासदारकी रद्द ; 'मोदी'वरील विधान भोवलं..

Rahul Gandhi Convicted in Defamation Case : लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi defamation case : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने त्यांना काल (गुरुवारी) दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

२०२४ ची निवडणुक ते लढवू शकणार नाही. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून काल सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरविले असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली होती. सुरतच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाची प्रत प्रशासनाने लोकसभा सचिवालयाला पाठवली होती , ही प्रत लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारली.

शिक्षा सुनावल्यानंतर २४ तासांच्या आत राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता ते सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत.

संविधानाच्या अनुच्छेद १०२ (१) आणि १९१ (१) नुसार खासदार आणि विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची नियमावली देण्यात आलेली आहे. त्यानुसार ही लोकसभेच्या सचिवालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही राहुल गांधींच्या वकिलांनी सांगितले होते. तथापि, राहुल यांच्याकडून आतापर्यंत उच्च न्यायालयात अपील करण्यात आलेले नाही.

या तीन गोष्टींमुळे राहुल गांधींवर कारवाई

  • नियमांनुसार एखादे लाभाचे पद सदस्य असताना मिळवले असल्यास, सदस्य मनोविकल असल्याचे सक्षम न्यायालयात सिद्ध झाल्यास किंवा भारतीय नागरिकत्व स्वेच्छेने सोडून परदेशी नागरिकत्व घेतले असल्यास सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्यात येते.

  • संविधानाच्या दहाव्या परिशिष्टात पक्षांतरबंदीच्या कारणांवरून सभागृहाचे सदस्यत्व रद्द करता येते.

  • लोकप्रतिनिधी कायदा (RPA) १९५१ नुसार जर एखादा सदस्य फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्यास आणि न्यायालयाने शिक्षा सुनावल्यास सदर सदस्याचे सदस्यत्व रद्द करता येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT