Shashi Tharoor  Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : नवे हिंदुहृदयसम्राट... भाजपचा लोकसभेसाठी मोठा प्लॅन; थरूरांनी थेट घेतलं नाव

MP Shashi Tharoor : शशी थरूर यांच्या विधानामुळे होऊ शकतो वाद...

Rajanand More

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून अयोध्येतील राम मंदिरावरून सध्याधारी भाजप व विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहे. भाजपकडून निवडणुकीसाठी मंदिराचा इव्हेंट केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यामध्येच आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनाच हिंदुहृदयसम्राट (Hindu Hriday Samrat) म्हटले जाते. त्याभोवती अनेकदा महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) फिरत असते. पण थरूर यांनी केलेल्या विधानाचा पडसाद आता महाराष्ट्रात उमटू शकतात. थरूर (Shashi Tharoor) यांनी हे विधान करताना अयोध्येतील राम मंदीर (Ram Mandir) आणि अबुधाबीतील बीएपीएस हिंदू मंदिराचा संदर्भ दिला आहे.

भाजपकडून नरेंद्र मोदी हे हिंदुहृदयसम्राट म्हणून 2024 च्या निवडणुकीत पुढे आणले येतील, हे स्पष्ट असल्याचे सांगताना थरूर म्हणाले, 22 जानेवारीला राम मंदीर आणि अबुधाबीतील बीएपीएस हिंदू मंदिराचे उद्घाटन होईल. त्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील, असे भाकितही थरूर यांनी केले. अबुधाबीतील हिंदू मंदीर संयुक्त अरब अमिरातीतील सर्वात मोठे मंदीर आहे. त्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण मोदींनी स्वीकारले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मध्ये नोटबंदीनंतर स्थिती विपरीत होत असताना पुलवामा दहशतवादी हल्ल्याला नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून प्रचार केला. आता 2024 मध्ये भाजप पुन्हा मूळ रुपात येईल. नरेंद्र मोदींनी हिंदूहृदयसम्राट म्हणून पुढे केले जाईल. 2024 मधील निवडणूक हिंदुत्व विरूध्द लोकप्रिय कल्याण होऊ लागली आहे, असे थरूर म्हणाले.

मोदी सरकारवर टीका करताना शरूर यांनी अच्छे दिन, दोन कोटी नोकऱ्यांचे काम झाले, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. आर्थिक-सामाजिक स्तरातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल, अशा आर्थिक विकासाचे काय झाले? या प्रश्नांवर हिंदुत्वाकडे झुकणाऱ्या निवडणुकीत चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षाही थरूर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT