Municipal Council Meeting : नगरपालिकेच्या बैठकीत आमदारासमोरच नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी

Shamli Municipal Council : चार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांना मंजुरीबाबत होती चर्चा...
Municipal Council Meeting : नगरपालिकेच्या बैठकीत आमदारासमोरच नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी
Published on
Updated on

Uttar Pradesh News : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका असो की जिल्हा नियोजन मंडळाची बैठक... अपेक्षित निधी मिळाला नाही तर वादावादी आलीच. पण नगरसेवकांमध्ये बैठकीतच तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कारण होते, चार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांवरील चर्चा. विशेष म्हणजे या बैठकीला स्थानिक आमदारही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हाणामारी झाल्याने सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शामली नगरपालिकेत (Shamli Municipal Council) गुरूवारी हा प्रकार घडला आहे. राज्याप्रमाणेच या नगरपालिकेतही भाजपची (BJP) सत्ता आहे. बैठकीमध्ये चार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यावर चर्चा नियोजित होती. त्यानुसार स्थानिक आमदार प्रसन्न चौधरी (Persann Kumar Chaudhary) व अध्यक्ष अरविंद संगल बैठकीला हजर होते.

Municipal Council Meeting : नगरपालिकेच्या बैठकीत आमदारासमोरच नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी
Basanagouda yatnal: कोरोना भ्रष्टाचाराचा 'व्हायरस' भाजप आमदाराच्या अंगलट; पक्षश्रेष्ठी कारवाई करणार ?

चर्चा सुरू असतानाच दोन नगरसेवकांमध्ये वाद सुरू झाला. काहीवेळा या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही सदस्य एकमेकांना भिडल्यानंतर इतरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना यामध्ये मध्यस्थी करून सदस्यांना शांत करावे लागले. यावेळी आमदारांप्रमाणे वरिष्ठ पोलिस अधिकारी, ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, विकासकामे झालीच नसतील तर बैठकीत दुसरे काय होणार? त्यामुळेच शामलीतील सदस्यांनी एकमेकांना मारहाण केली. बैठकीत आपल्या सुरक्षेच्या व्यवस्था आपण करावी, असा भाजप काळातील हा धडा असल्याचा टोलाही यादव यांनी लगावला.

अखिलेश यादव यांच्याकडून भाजप सरकारवर सातत्याने टीका केली जाते. उत्तर प्रदेशात घडणाऱ्या घटनांचा आधार त्यांच्याकडून घेतला जातो. प्रामुख्याने भाजपचा सत्ता असलेल्या नगरपालिका, महापालिका तसेच आमदारांशी संबंधित घटनांची दखल घेत यादव यांच्याकडून योगी सरकारवर टीका केली जात आहे.

Municipal Council Meeting : नगरपालिकेच्या बैठकीत आमदारासमोरच नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी
Modi Govt Selling Scrap : मोदी सरकारने भंगार विकून 1200 कोटी कमावले; एवढ्या पैशात दोन चांद्रयान मोहीमा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com