Rahul Gandhi | Sonia Gandhi | Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Congress New Headquarters : भाजपनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचाही पत्ता बदलणार; काय आहे 'इंदिरा गांधी' भवन; VIDEO पाहा

Congress New Office 9A Kotla Road New Delhi : येत्या 15 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या या नव्या मुख्यालयाचे उद्धघाटन होणार असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.

Mangesh Mahale

Congress New National Office: देशातील मुख्य विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने बीजेपीच्या धर्तीवर दिल्लीमध्ये पक्षाचं नवं राष्ट्रीय मुख्यालय उभारलं आहे. 24 अकबर रोड, असा आत्तापर्यंत काँग्रेस कार्यालयाचा दिल्लीतील पत्ता होता. आता हा पत्ता लवकरच बदलणार आहे.

काँग्रेसच्या मुख्य कार्यालयालाचा पत्ता हा 9 ए कोटला रोड,नवी दिल्ली असा आहे. 'इंदिरा गांधी'भवन असे या मुख्यालयाचे नामकरण करण्यात आले आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सोशल मीडिया X वर याबाबतची माहिची शेअर केली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या या नव्या मुख्यालयाचे उद्धघाटन होणार असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी या उद्धघाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. देशभरातील पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना या उद्धघाटन सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

1978 पासून काँग्रेसचे सध्याच्या कार्यालयात (24, अकबर रोड) कामकाज सुरु आहे. नवीन कार्यलय जरी झाले असले तरी पक्षाचे काही विभाग याच कार्यालयातून(24, अकबर रोड) राहणार असल्याची माहिती आहे. तर पक्षाचे नवं कार्यालयात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झाले आहे. येथून पक्षाचे संघटन, प्रशासन, रणनीतीची तयारी आदी महत्वाची कामे होणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेला पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. या नव्या भव्य मुख्यालयामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेस काय डावपेच आखणार, हे काही दिवसात समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT