Sanjay Raut : अजितदादांना कुठले पुरावे पाहिजेत? ते नेते नाहीत, ते 'ॲक्सिडेंटल' नेते आहेत!

Sanjay Raut Attacks on Ajit Pawar Over Santosh Deshmukh Case:'अजितदादा महाराष्ट्राचे नेते असते, तर बीडच्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळलं असते,' असे सांगत संजय राऊत यांनी यांनी अजितदादांना कुठले पुरावे पाहिजेत? असा सवाल उपस्थित केला आहे.
Sanjay Raut Attacks on DCM Ajit Pawar
Sanjay Raut Attacks on DCM Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

सरपंच संतोष देशमुख हत्येशी संबधीत खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. कराड व त्याचे साथीदार हे मुंडे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचे आढळले आहे. त्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांचे नाव चौकशी आले नसल्याचे सांगत मुंडेंना क्लीनचीट दिली आहे.

मुंडे यांचा राजीनामा घेण्यास नकार देणाऱ्या अजितदादांची ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली होती. दिल्ली येथे राऊत माध्यमाशी बोलत होते. 'अजितदादा महाराष्ट्राचे नेते असते, तर बीडच्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळलं असते,' असे सांगत संजय राऊत यांनी यांनी अजितदादांना कुठले पुरावे पाहिजेत? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Raut Attacks on DCM Ajit Pawar
Lalit Gandhi: जैन महामंडळ अध्यक्ष नियुक्तीचा वाद चिघळणार? फडणवीसांसमोरच आमदार यड्रावकर म्हणाले....

देशमुख हत्याकांडानंतर बीड पोलिसांवर टीका होत आहे. त्यावर राऊत म्हणाले, "बीड पोलिस करीत असलेला तपास हा धुळफेक आहे. अजूनही आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरे आरोपी आजही बाहेर आहेत. देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालला पाहिजे. बीडचे संपूर्ण पोलीस खाते बरखास्त करून तिथे नवीन नेमणुका व्हायला पाहिजे,"

Sanjay Raut Attacks on DCM Ajit Pawar
Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकींची हत्या कशामुळे झाली? पोलिसांनी सांगितली ही दोन मुख्य कारणं, अभिनेता सलमानला मारण्याचा...

अजित पवार हे नेते नाहीत, ते हतबल झाले आहेत, अजितदादा हे ॲक्सिडेंटल नेते आहेत, असा टोमणा राऊतांनी हाणला. अजित पवार हे जर महाराष्ट्राचे नेत असते तर त्यांनी देशमुख हत्या प्रकरणातील मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, त्यांना आता आणखी कोणते पुरावे हवे आहेत, असा खडेबोल राऊतांनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com