नवी दिल्ली :काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 24 वर्षांनंतर आज (सोमवारी) मतदान होत आहे.मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)आणि शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात थेट लढत (Congress Presidential Election) आहे. देशभरातील प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) कार्यालयात 9 हजार प्रतिनिधी (मतदार) मतदान करतील. (Congress Presidential Election news updates)
यापूर्वी 1998 मध्ये सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यात झालेल्या निवडणुकीत मतदान झाले होते. 24 वर्षांमध्ये कँग्रेस पक्ष ( Congress Party) अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली नव्हती. ती आज होत आहे.दोन-अडीच दशकांनंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष पदावर निवडला जाणार आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय आणि देशभरातील 65 मतदान केंद्रांवर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे.
निवडणुकीत 36 मतदान केंद्रे, 67 बूथ असतील. जास्तीत जास्त 6 बूथ यूपीमध्ये असतील. प्रत्येक 200 प्रतिनिधींसाठी एक बूथ तयार करण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले राहुल गांधी यांच्यासह 47 प्रतिनिधी कर्नाटकातील बेल्लारी येथे मतदान करणार आहेत. यात्रेच्या शिबिरात स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे.
काँग्रेस अध्यक्ष पदासाठी गुप्त मतपत्रिकेद्वारे इलेक्टोरल कॉलेजमधून 9,000 पेक्षा अधिक प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी मतदान करतील. हे प्रतिनिधी दर पाच वर्षांनी संस्थेतून निवडले जातात. खरगे आणि थरूर हे दोन दावेदार कर्नाटक आणि केरळ या त्यांच्याशी संबंधित राज्यांमध्ये मतदान करणार आहेत. सोनिया गांधी, प्रियंका गांधी, डॉ मनमोहन सिंग हे दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात मतदान करणात आहेत.
"सर्व राज्यांतील प्रतिनिधी आपापल्या मतदान केंद्रांवर उपलब्ध मतपत्रिकांमध्ये त्यांना हव्या त्या उमेदवाराला पाठींबा देणाऱ्या उमेदवाराला 'टिक' चिन्ह देतील.मतदान सुरळीत मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली आहे," असे काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले.
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी शेवटचे मतदान 1998 मध्ये झाले होते. तेव्हा सोनिया गांधींसमोर प्रतिस्पर्धी म्हणून जितेंद्र प्रसाद हे उभे होते. सोनिया गांधींना सुमारे 7,448 मते मिळाली, पण जितेंद्र प्रसाद यांना 94 मते पडली. सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यावर गांधी घराण्याला कधीही आव्हानाचा सामना करावा लागला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.