Narendra Modi Oath Ceremony
Narendra Modi Oath Ceremony Sarkarnama
देश

Swearing in Ceremony of Narendra Modi : ‘इंडिया आघाडी’तील एकच नेता मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार

Rajanand More

Narendra Modi Shapath Vidhi : एनडीए सरकारच्या शपधविधीसाठी विरोधी पक्षांतील नेत्यांना शनिवारी सायंकाळपर्यंत निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे विरोधकांकडून शपधविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला जाणार का, अशी चर्चा रंगली होती. शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना निमंत्रण मिळालं. पण ते शपथविधीला उपस्थित राहणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.

खर्गे यांना भाजपचे नेते प्रल्हाद जोसी यांच्यामार्फत निमंत्रण पाठवले आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनमध्ये मल्लिकार्जून खर्गे उपस्थित राहणार आहे. ते इंडिया आघाडीचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे समजते.

काँग्रेस पक्ष व आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा केल्यानंतर खर्गे यांनी शपथविधीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. इंडिया आघाडीतील काँग्रेसनंतर सर्वात मोठा असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनाही निमंत्रण मिळालेले नाही.

निमंत्रणाबाबत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, शपथविधीला उपस्थित राहणार नाही. आपल्याला कोणतेही निमंत्रण नाही. देशासाठी माझ्या सदिच्छा आहेत. पण मी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर पक्षाला सरकार स्थापनेच्या शुभेच्छा देणार नाही, अशी टीकाही ममतांनी शनिवारी केली होती.

दरम्यान, निमंत्रण न मिळाल्यावरून काँग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पक्षाचे नेते जयराम रमेश शनिवारी म्हणाले होते की, नरेंद्र मोदींच्या शपथविधीला केवळ आंतरराष्ट्रीय नेत्यांना निमंत्रित केले जात आहे. आमच्या नेत्यांना निमंत्रण मिळालेले नाही. निमंत्रण मिळाल्यास शपथविधीला उपस्थित राहण्याबबाबत विचार केला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT