PM Narendra Modi Oath Ceremony LIVE : चार पॉवरफुल मंत्रालयांसाठी मोदींच्या मनात कोण?   

PM Narendra Modi oath ceremony 2024 LIVE Updates NDA Government : मोदी सरकारला तिसऱ्या टर्मसाठी एनडीएतील घटक पक्षांना अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे महत्वाची खाती कुणाला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama

Narendra Modi Government 3.0 : एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत भाजपसह इतर घटक पक्षातील काही खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह इतर घटक पक्षांवर अधिक अवलंबून राहावे लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या खासदारांनाही मंत्रिमंडळात काही महत्वाची खाती द्यावी लागणार आहे. तसे संकेतही शनिवारपर्यंत मिळत होते.

मंत्रालयांमध्ये चार सर्वात महत्वाची खाती मानली जातात. त्यामध्ये गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र या मंत्रालयांचा समावेश आहे. ही मंत्रालये भाजप स्वत:कडेच ठेवणार असल्याचे समजते. तसेच मागील टर्मप्रमाणेच या खात्यांचा कारभार अनुक्रमे अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण आणि एस. जयशंकर यांच्याकडेच राहू शकतो.

या चार मंत्रालयांव्यतिरिक्त रस्ते वाहतूक आणि महामार्ग, शिक्षण, संसदीय कामकाज, माहिती व प्रसारण ही महत्वाची खातीही भाजप सोडणार नसल्याची जोरदार चर्चा आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय नितीन गडकरी यांच्याकडे राहील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

PM Narendra Modi
Oath Ceremony In India : राजनाथ सिंह, चिराग पासवान, कुमारस्वामी, शिंदे अन्..., 'या' नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन; महाराष्ट्रातून कुणाला?

मित्रपक्षांकडून लोकसभेचे अध्यक्षपद मागितले जात असले तरी भाजप ते आपल्याकडेच ठेऊ शकते. घटकपक्षांना इतर 12 ते 15 मंत्रालये मिळू शकतात. टीडीपीचे दोन, जेडीयूचे एक, शिवसेना एक, लोक जनशक्ती पार्टी एक, राष्ट्रीय लोकदल एक आणि इतर छोट्या पक्षांना प्रत्येक एक अशी मंत्रिपदं दिली जाऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जवळपास चार डझन खासदारांचा शपथविधी होऊ शकतो. त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला पाच मंत्रिपदं येऊ शकतात. नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले हेही रविवारी शपथ घेणार आहेत. त्यामध्य गडकरी, गोयल आणि जाधव यांना कॅबिनेट मंत्रिपद तर इतरांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com