Pune News : सध्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत सरकारवर जोरदार निशाना साधला. त्यांनी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना, एनडीए सरकारवर हल्लाबोल केला. महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्यांना काँग्रेस अध्यक्षांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच महाकुंभात हजारो लोकांनी आपले प्राण गमावल्याचा धक्कादायक दावा खर्गे यांनी केला. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला.
या गोंधळातच खर्गे यांनी, आपण, त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असून सरकारच्या नाकर्तेपणामुळे हजारो भाविकांचे जीव गेल्याचा आरोप केला. यावरून सभागृहात बराच गदारोळ झाला. तर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांचे विधान मागे घेण्यास सांगितले. यानंतर आता 'खर्गे साहब फायर', अशा मथळ्याचा 26 सेकंदांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
यादरम्यान एका सद्यस्याने खर्गे यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतल्याने ते चांगलेच संतापल्याचे आता दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत खर्गे चांगलेच संतापले असून त्यांनी त्या सदस्याला फटकारत 'गप्प गप्प' असे अनेकदा म्हटलं आहे.
खर्गे राज्यसभेत बोलत अशतानाच, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र तथा भाजप खासदार नीरज शेखर यांच्याशी त्यांचा जोरदार वाद झाला. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून नीरज शेखर यांनी अक्षेप घेतला होता. तर यावरून वरंवारं खर्गे यांना रोखत होते. यावरून खरगे म्हणाले की, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. चंद्रशेखर हे एक वरिष्ठ नेते होते, त्यांनी यांच्यासोबत काम केलं आहे आणि त्यांना अटकही झाली होती.
'मी सभागृहात तुमच्या वडिलांचा जोडीदार होतो.' तू कशाबद्दल बोलत आहेस? मी एक मिनिट तुला बघतो. गप्प बस, असे रागाने खर्गे यांनी म्हटलं आहे.
खर्गे यांच्या "हजारो लोक" या शब्दावरून सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. तर सभापती जगदीप धनखड यांनीही या मुद्द्यावर खरगे यांना अडवले. जर तुम्ही 'हजारो लोकांच्या' मृत्यूबद्दल बोलत असाल तर मी तुम्हाला तुमच्या विधानाकडे लक्ष देण्याचे आवाहन करेन. तुम्ही कोणत्या प्रकारचा संदेश देत आहात? मी तुम्हाला आवाहन करतो आणि तुम्ही तुमचे विधान मागे घ्यावे, असे सभापती जगदीप धनखड म्हणाले.
खरगे म्हणाले की, हा अमृतकाळ आहे किंवा विषकाळ आहे. गेल्या 10 वर्षांत एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळत नाही. उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही. सत्ताधारी पक्षाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अनादर केला. मनमोहन सिंग यांनी केलेले महत्त्वाचे काम तुम्ही करू शकत नाही. त्यांनी जीएसटी, नोटाबंदी आणि कोविड व्यवस्थापन हे अपयश असल्याचे म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.