Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी, म्हणाले 'अमित शाह यांना...'

Mallikarjun Kharge Amit Shah Narendra Modi : अमित शहा हे काल जे बोलले ते निषेधार्ह आहे. या लोकांचा संविधानावर विश्वास नाही. जे स्वर्ग-नरकाबद्दल बोलतात ते मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले
Narendra Modi, Mallikarjun Kharge
Narendra Modi, Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Mallikarjun Kharge News : गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने काँग्रेस आक्रमक झाली आहे. सभागृहासोबत सभागृहाबाहेर देखील काँग्रेस अमित शाह यांच्या विधानाचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, 'अमित शाहा यांनी राजीनामा द्यायला हवा. मोदींना आंबेडकारांविषयी श्रदा असेल तर त्यांनी अमित शाहांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवे. जी व्यक्ती संविधानाची शपथ घेते आणि तीच व्यक्ती संविधानाचा अपमान करत असेल तर तिला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकारी नाही.

'अमित शाहा हे काल जे बोलले ते निषेधार्ह आहे. या लोकांचा संविधानावर विश्वास नाही. जे स्वर्ग-नरकाबद्दल बोलतात ते मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात. त्यांचे गुरू गोळवलकरही तीच भाषा बोलत. त्यांचे शिक्षणही त्याच शाळेतून झाले तेही तीच भाषा बोलत आहेत', असे देखील खर्गे म्हणाले.

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Amit Shah : विरोधकांनी अमित शहांना घेरण्यासाठी सर्व आयुधे काढली बाहेर; 12 पर्यंत अल्टिमेटम अन् संसदेत मोठा प्रस्ताव...

गृहमंत्री शहा जे बोलत आहेत त्यांचा बचाव करण्यासाठी मोदीसाहेबांनी सहा वेळा ट्विट केले आहेत. अमित शाहा हे चुकीचे बोलले आणि त्यांना वाचवायला पंतप्रधान ट्विट करत आहेत.', असे देखील खर्गे यांनी सांगितले.

एकमेकांचे पाप धुवून टाकतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांना अडवण्याऐवजी त्यांना पाठिंबा दिला. दोघेही खूप जवळचे मित्र असून एकमेकांची पापे धुवून टाकतात. आंबेडकर हे संपूर्ण देशाचे पूजनीय आहेत मात्र भाजपच्या लोकांचा संविधानावर विश्वास नाही.

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Priyanka Gandhi News : प्रियंका गांधी असणार 'वन नेशन-वन इलेक्शन' विधेयकासाठीच्या 'जेपीसी'चा भाग!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com