Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Congress Vs Amit Shah: ...अन् जम्मू काश्मीरबद्दलचा एकच प्रश्न विचारत काँग्रेसनं केली अमित शाहांची कोंडी

Amit Shah On Jammu Kashmir News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (ता.21) राज्यसभेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर जोरदार भाष्य केलं. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीत आता बदलली असल्याचे अमित शाह म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी(ता.21) राज्यसभेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर जोरदार भाष्य केलं. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीत आता बदलली असल्याचे अमित शाह (Amit Shah) म्हणाले. त्यांच्या या दाव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सडकून टीका करत केंद्रातील सत्ताधारी भाजपलाच घेरलं. परिस्थिती बदलली आहे, तर मग जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा का परत देत नाही? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील दहशतवादावर चांगलाच हल्लाबोल केला. शाह म्हणाले, आमचे सरकार दहशतवाद आणि दहशतवाद्यांनाही सहन करू शकत नाही. त्यावरुन काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शहांना प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, अमित शाह जगभरातल्या विषयांवर बोलले, पण, मात्र आपल्या संपूर्ण भाषणात जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर एकही शब्द त्यांनी काढला नाही. काश्मिरमधील परिस्थिती बदलली असल्याचे ते सांगतात, मग काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा कधी परत देणार हेही सांगायला हवे, असे जयराम रमेश (Jayram Ramesh) म्हणाले.

इतकंच नाही, तर महाराष्ट्रात दंगे होत आहेत, तिथेही डबल इंजिन सरकार आहे, त्यावरही त्यांनी काहीच सांगितलं नाही. जे खरे मुद्दे होते, त्यावर त्यांनी काहीही बोललं नाही. मणिपूर आणि नागालँडबद्दलही काहीच बोलले नाही. या सगळ्या मुद्यांवर त्यांनी आधी बोलायला हवं असे जयराम रमेश म्हणाले.

जनगणना कधी करणार ?

जयराम रमेश पुढे म्हणाले, "आम्ही एक आणखी प्रश्न उपस्थित केला, की तुम्ही जनगणना कधी करणार? 2021 मध्ये ती होणे अपेक्षित होती. जनगणना न करण्याचा परिणाम असा झाला आहे की, सुमारे 14 कोटी भारतीय नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळत नाही. 15 कोटी नागरिकांना धान्य मिळत नाही."

"चार वर्षं होऊनही जनगणना झालेली नाही. यावरही गृहमंत्र्यांनी काहीही टिप्पणी केली नाही," असे त्यांनी सांगितले. जयराम रमेश म्हणाले, "त्यांनी दोन तासांचं भाषण दिलं, दुनियाभराची चर्चा केली, पण जनगणना किंवा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी दिला जाईल, याबाबत काहीही सांगितलं नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT