Rahul Gandhi on NEET exam Sarkarnama
देश

NEET paper leak issue : ‘अमृतकाल’ नव्हे तर ‘विषकाल’; NEET रद्द होताच राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

NEET exam cancellation controversy, Congress leader Rahul Gandhi attacked NDA government and questioned PM Narendra Modi “Amritkaal” vision : NEET 2026 परीक्षा पेपर लीकवरून रद्द होताच, लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्या 'अमृतकाल'वरून घणाघात केला.

Pradeep Pendhare

NEET exam cancellation news : पेपर फुटीच्या संशयावरून NEET 2026 रद्द होताच, देशातील 23 लाख हून विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीतील मोदी सरकारवर यावरून निशाणा साधला. पंतप्रधानांचा तथाकथिक अमृतकाल हा देशासाठी विषकाळ ठरत आहे, असे घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

देशात होत असलेली NEET 2026 ही पेपर फुटीवरून रद्द करण्यात आली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे (Student) भवितव्य या मुळे टांगलीला आले आहे. ही पेपर फुटी थांबवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, प्रशासकीय यंत्रणा का अपयशी ठरत आहे, यावर मंथन होण्याऐवजी आता यावरून राजकारण सुरू झालं आहे.

लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, NEET 2026 परीक्षा रद्द झाली आहे. 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्नं या भ्रष्ट भाजप व्यवस्थेने चिरडून टाकली. काही विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी कर्ज घेतलं आहे. काहींच्या कुटुंबाने मुलाच्या शिक्षणासाठी दागिने गहाण ठेवले आहेत. विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून, रात्र-रात्र अभ्यास केला आहे. त्या सर्वावर भ्रष्ट भाजप व्यवस्थेने पाणी फिरवले आहे.

मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबात, पेपर फुटी, सरकारचा बेजबाबदारपणा, शिक्षणातील संघटीत भ्रष्टाचार आला आहे. हे सरकारचे फक्त अपयशच नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर केलेला गुन्हा आहे. पेपर फुटीत नेहमी त्यातील माफिया सुटतो. विद्यार्थ्यांच्या नशिबी फक्त तणाव, आर्थिक ओझे आणि अनिश्चिचतता का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य त्यांच्या कष्टाने सुनिश्चित होण्याऐवजी पैसा आणि वशिल्याबाजीने सुनिश्चित होणार असेल, तर शिक्षणाला काहीच अर्थ उतर नाही. पंतप्रधानांचा तथाकथित ‘अमृतकाल’ हा देशासाठी ‘विषकाल’ ठरला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

NEET UG 2026 परीक्षेचे पेपर फुटल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. टेलिग्राम या सोशल मीडियावर पेपरमधील साधर्म्य असलेले प्रश्न फिरत आहेत. सुमारे 140 प्रश्न परीक्षेच्या अगोदर लीक झाले आहेत. ते प्रश्नपत्रिकेतील संचाशी जुळत आहे. या मुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.

राजस्थानच्या सिकर भागातील परीक्षा केंद्रांवर आणि कोचिंग नेटवर्क्समध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) केंद्रीय तपास यंत्रणेला परीक्षेच्या सुरक्षेमध्ये त्रुटी आढळल्याने ही परीक्षा केंद्राकडून रद्द करण्यात आली आहे. NEET 2026 परीक्षेसाठी 23 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत असून, देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा बनली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT