Ashok Kharat ED case : ‘गुन्ह्यातील पैसा कुणाच्या खिशात?’ अशोक खरातला मुंबईत विशेष न्यायालयात बोलावलं

Mumbai Special Court has ordered Nashik-based Ashok Kharat appear questioning money laundering case, raising possibility ED action and arrest : मनी लाॅड्रिंग गुन्ह्यातील तपासाला वेग घेण्यासाठी ईडीने मुंबई विशेष न्यायालयात अशोक खरातविरोधात धाव घेतली आहे.
Ashok Kharat ED case
Ashok Kharat ED caseSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat inquiry : भोंदू अशोक खरात याच्या गुन्ह्यातील पैसा कुणाच्या खिशात जात होता? विशेष करून मनी लाॅन्ड्रिंगमधील पैशाचे पडद्यामागील खरे लाभार्थी कोण? याच्या तपासासाठी 'ईडी'ने कंबर कसली आहे.

मुंबई विशेष न्यायालयाने अशोक खरात याला 18 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश केला आहे.

भोंदू अशोक खरातला 18 मे रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेची मागणी केल्यानंतर न्यायालयाने त्याच्या हजर राहण्याचे वॉरंट जारी केले आहे. 18 मे रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर ईडी त्याला औपचारिक अटक करून पुढील चौकशीसाठी कोठडीची मागणी करू शकते.

विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी नाशिक (Nashik) कारागृह अधीक्षकांना खरात याला कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. आरोपीला न्यायालयात आणताना पुरेशी पोलिस सुरक्षा द्यावी, असे आदेश नाशिक पोलिसांना देण्यात आले आहेत.

Ashok Kharat ED case
Ashok Kharat ED case : 'ED'चा ससेमिरा वाढला; अशोक खरातच्या ताब्यासाठी न्यायालयात अर्ज

मार्च महिन्यात अत्याचाराच्या अनेक लैंगिक तक्रारींनंतर खरातला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत असून, गेल्या आठवड्यात त्याला नाशिक कारागृहात हलवण्यात आले. त्यानंतर सोमवारी न्यायालयाने त्याच्या हजर राहण्याचा वॉरंट जारी केले.

Ashok Kharat ED case
Ashok Kharat ED probe : अशोक खरातचं आर्थिक साम्राज्य उघड! 60 बँक खात्यांतून कोट्यवधींची उलथापालथ; ED तपासात धक्कादायक माहिती समोर

ईडीने यापूर्वी मुंबईतील न्यायालयात अर्ज दाखल करून खरात याची अटक आवश्यक असल्याचे सांगितले होते. गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा अंतिम लाभार्थी कोण आहे? हे शोधण्यासाठी तसेच महाराष्ट्रभर धार्मिक प्रभाव आणि फसवणुकीद्वारे लोकांकडून पैसे उकळणाऱ्या मुख्य व्यक्तीची चौकशी करण्यासाठी खरातची उपस्थिती आवश्यक आहे, असे ईडीने अर्जात म्हटले होते.

ईडीने अशोक खरातशी संबंधित ठिकाणी छापे टाकले असून, त्याच्या घर आणि कार्यालयातून रिअल इस्टेट व्यवहार व मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडीने अशोक खरातच्या बँक लॉकर्समधून सुमारे 1.10 कोटींचे सोन्याचे दागिने आणि 5500 अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत. अशोक खरातची अंदाजे 2.40 कोटींची बँक खात्यांमधील रक्कम गोठवण्यात आली आहे. SIT तपासात अशोक खरातने अवघ्या 4 वर्षांत सुमारे 70 कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचे उघड झाले आहे.

अशोक खरातच्या मालमत्तेचे मूल्य 15000 कोटींहून अधिक असल्याचा संशय आहे, तर सुरुवातीच्या तपासानुसार ही मालमत्ता 300 कोटींच्या घरात असल्याचे समोर आले होते. नाशिकमधील आलिशान बंगला, कार्यालये, फार्म हाऊस आणि अनेक ठिकाणी जमीन, तसेच 70 हून अधिक प्रॉपर्टीज कुटुंबाच्या नावावर असल्याचे तपासात समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com