Former MLA Sanjay Dutt Haryana Congress incharge: Sarkarnama
देश

Congress Reshuffle: पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी क्षणात आमदारकी सोडली : काँग्रेसकडून तब्बल 17 वर्षांनंतर राष्ट्रीय पातळीवर संधी

Former MLA Sanjay Dutt Haryana Congress incharge: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल जाहीर केले. माजी आमदार संजय दत्त यांची हरियाणा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

Mangesh Mahale

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत विविध राज्यांसाठी नव्या प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर उत्तर प्रदेश, हरयाणा आणि ओडिशा या राज्यांच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रभारींची नावे घोषित करण्यात आली. काँग्रेसने याबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे.

कल्याण येथील काँग्रेसचे नेते, माजी आमदार संजय दत्त यांना कॉंग्रेसने हरियाणा राज्याचे प्रभारी बनवले आहे. कॉंग्रेस पक्षात प्रभारी पद हे राष्ट्रीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस यांच्यातील समनव्य मानले जाते. निर्णय प्रक्रियेत या पदाला महत्त्वाचे स्थान आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पद सोडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कोणत्याही सभागृहाचे सदस्य होण्यासाठी आवश्यकता असताना संजय दत्त यांनी विधानपरिषद आमदार पदाचा राजीनामा दिला होता. संजय दत्त हे काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक, धोरणात्मक व पडद्यामागे काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात.

उत्तर प्रदेश:राजेंद्र पाल गौतम

नव्या नियुक्तीनुसार राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली असून लालजी देसाई यांना ओडिशा तर संजय दत्त यांना हरयाणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. या सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

अविनाश पांडे, अजय कुमार लल्लू

काँग्रेसच्या पत्रकात मावळते प्रभारी अविनाश पांडे, बी. के. हरिप्रसाद आणि अजय कुमार लल्लू यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी आणि राज्यांमधील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी नव्या प्रभारींना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

सामाजिक समीकरणे

उत्तर प्रदेशासाठी राजेंद्र पाल गौतम यांची निवड राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जात आहे. दिल्ली सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेले गौतम सध्या काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दलित समाजात त्यांचा प्रभाव लक्षात घेता काँग्रेसने उत्तर प्रदेशातील सामाजिक समीकरणे मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संघटन विस्तार

उत्तर प्रदेशात गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसला संघटनात्मक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सोशल इंजिनिअरिंग आणि नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, ओडिशा आणि हरयाणामधील नव्या नियुक्त्यांमुळे त्या राज्यांतील संघटन विस्तार आणि निवडणूक यंत्रणा अधिक सक्रिय करण्यावर पक्षाचा भर असल्याचे दिसून येत आहे. आता या नव्या प्रभारींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये कितपत राजकीय फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT