Rahul Gandhi Vacates Bungalow Sarkarnama
देश

Rahul Gandhi Vacates Bungalow: सरकारी बंगला सोडल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसची विशेष मोहीम 'मेरा घर आपका घर'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (२२ एप्रिल) दिल्लीताल 12 तुघलक लेन येथील सरकारी निवासस्थान सोडले.

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandhi Vacates Bungalow: लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (२२ एप्रिल) दिल्लीताल 12 तुघलक लेन येथील सरकारी निवासस्थान सोडले.यापुढे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ येथील निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना संसदेतून अपात्र ठरवल्यानंतर दोन दिवसांनी लोकसभा हाऊसिंग पॅनलने त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार आज त्यांनी सरकारी बंगला सोडला. (Congress special campaign 'Mera Ghar Aapk Ghar' in support of Rahul Gandhi after leaving the government bungalow)

राहुल गांधींवर झालेल्या या कारवाईनंतर आता काँग्रेसने सोशल मिडीयावर राहुल गांधींच्या समर्थनार्थ विशेष मोहिम सुरु केली आहे. "मेरा घर आपका घर" अशी मोहिम काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर सुरु केली आहे. इतकेच नव्हे तर "हा देश राहुल गांधींचे घर आहे. लोकांच्या हृदयात राहणारे राहुल, ज्यांचे जनतेशी अतूट नातं आहे. कुणाला त्यांच्यात त्यांचा मुलगा दिसतो, कुणाला भाऊ, कुणाला त्यांचा नेता, राहुल गांधी सर्वांचे आहेत आणि सर्वजण राहुल गांधींचे आहेत. म्हणूनच आज संपुर्ण देश म्हणत आहे. राहुल जी, माझे घर ते तुमचे घर." असे ट्विटही काँग्रेसने केलं आहे. (Congress- Rahul Gandhi news)

दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणी, प्रियांका गांधी वाड्रा यांनीही सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी सरकारबद्दल खरे बोलल्यामुळेच त्यांच्यासोबत हे सर्व घडत आहे, पण ते खूप धैर्यवान आहेत, कोणालाही घाबरणारे नाहीत आणि कधी घाबरणारही नाहीत. ते त्यांचा संघर्ष सुरूच ठेवतील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (Political news)

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी वेणुगोपाल यांनी ही ट्विट करच राहुल यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. '' ते तुम्हाला घरातून बाहेर काढू शकतात, परंतु तुमचे स्थान नेहमीच आमच्या घरात आणि हृदयात असेल. आम्हाला माहित आहे या गोष्टी तुम्हाला तुमचा आवाज उठवण्यापासून आणि सत्य बोलण्यापासून थांबवणार नाहीत. आज संपूर्ण देश एका स्वरात म्हणत आहे, माझे घर तुमचे घर आहे.'' असे ट्विट वेणुगोपाल यांनी केलं आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचार सभेत केलेल्या, एका वक्तव्या प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या (Gujarat) सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधींनी मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. मात्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. (National Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT