Rahul Gandhi House Shifting: लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींना आज (२२ एप्रिल) त्यांचा सरकारी बंगला सोडावा लागणार आहेत. यापुढे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ येथील निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्यानंतर दोन दिवसांनी लोकसभा हाऊसिंग पॅनलने त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली होती. ( Rahul Gandhi will leave the government bungalow today: He will hand over the house keys to the officials)
राहुल गांधींनी शुक्रवारपर्यंत सरकारी बंगल्यातील सर्व सामान रिकामे केले. राहुल गांधी स्वत: 12, तुघलक लेन येथील बंगला आज (22 एप्रिल) लोकसभा सचिवालयाकडे सोपवतील. आज त्यांची बंगला रिकामा करण्याची मुदत संपत आहे. अशा स्थितीत स्वत: राहुल गांधी स्वत: संबंधित मालमत्तेच्या चाव्या अधिकाऱ्यांकडे सोपवणार आहे.
निवडणुकीच्या प्रचार सभेत केलेल्या, एका वक्तव्या प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या (Gujarat) सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधींनी मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. मात्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
"सर्व चोरांचे आडनाव मोदी का?" या विधानासाठी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ही शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी याचिका राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात दाखल केली होती. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर त्यांनी सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या.
काँग्रेस नेते 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहत होते. 2004 मध्ये ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता. नियमानुसार, त्यांना अपात्रतेच्या आदेशाच्या तारखेपासून (24 मार्च) एक महिन्याच्या आत त्यांचा सरकारी बंगला रिकामा करायचा होता. या नोटिशीला उत्तर देताना राहुल गांधी यांनी बंगला रिकामा करण्यासाठी नोटीसचे पालन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज ते सरकारी बंगला रिकामा करणार आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.