New Delhi :आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ऑनलाइन देणगी गोळा करण्यासाठी काँग्रेस 'डोनेट फॉर देश' नावाची मोहीम सुरू करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १८ डिसेंबर रोजी या मोहिमेचा प्रारंभ करणार करणार आहेत. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे. मात्र काँग्रेस १३८ रुपयेच का घेणार आहेत. याबाबत आता चर्चा रंगली आहे.
वेणुगोपाल म्हणाले, कॉग्रेस चांगल्या भारतासाठी पक्षासोबत असलेल्या सर्वांकडून देणग्या मागत आहेत. 28 डिसेंबरपर्यंत पक्षाच्या स्थापना दिनापर्यंत ही मोहीम ऑनलाइन सुरु राहील. त्यानंतर या मोहिमे अंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रत्येक बूथमधील किमान 10 घरांमधून 138 रुपयांची देणगी घेईल. देणगी देणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल, असे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देशाचा मुख्य विरोधी पक्ष असलेला कॉग्रेस 28 डिसेंबर रोजी आपला 138 व्या स्थापना दिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त या मोहिमेद्वारे 138 रुपये, 1,380 रुपये, 13,800 रुपये किंवा या रकमेच्या 10 पट देणगी देण्याचे आवाहन लोकांना करणार आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले, पक्ष निधीसाठी संघर्ष करत आहे आणि 'भाजपच्या निवडणूक यंत्रणे'शी लढण्यासाठी निधीची कमतरता आहे.
दरम्यान 28 डिसेंबरला काँग्रेसने मोठी रॅली काढण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे रॅली होणार आहे. 10 लाख लोकांना एकत्र करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष याला सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात मानत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.