Congress News : दारुण पराभवानंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर; पटवारींना अध्यक्ष केल्यानंतर राजस्थानातही बदल?

Congress News : मध्य प्रदेशात काँग्रेसने जातीय समीकरण साधलं...
Congress News :
Congress News :Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाने जबाबदारी निश्चित करून, बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात मध्य प्रदेशातून झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडून जबाबदारी काढून घेत, जितू पटवारी यांच्याकडे प्रदेश काँग्रेसची जबाबदारी सोपवली आहे. यामुळे आता काँग्रेसने मरगळ झटकून पक्षाच्या संघटन बळकटीसाठी फेरबदल केले आहेत. (Latest Marathi News)

Congress News :
Lok Sabha Election : गडकरी, फडणवीस अन् 'आरएसएस'च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेस लोकसभेचा शंखनाद करणार

जितू पटवारी यांची ओळख नव्या पिढीतील नेते अशी आहे. ते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या गटबाजीच्या राजकारणापासून दूर असल्याचेही बोलले जाते. पटवारी यांच्यावर पक्षनेतृत्वाचा विश्वास असून ते तरुणांना पक्षाशी जोडू शकतात. सर्व नेत्यांना सोबत घेण्यावर पटवारींचा विश्वास आहे. त्यामुळेच प्रदेश काँग्रेसमध्ये पक्षाने ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी कमी करुन प्रदेशाध्यक्षपदासाठी जितू पटवारी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

Congress News :
Madhya Pradesh : पराभव काँग्रेसच्या जिव्हारी, कमलनाथ यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा...

मध्य प्रदेशात भाजपने मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलासाठी दबाव वाढला होता. यामुळेच काँग्रेसने पक्षाच्या पातळीवर बदल करत जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. जितू पटवारी हे ओबीसी समाजातून येतात. तसेच, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे उमंग सिंघार यांची आदिवासी नेते म्हणून ओळख आहे. तर उपनेतेपदी असलेले हेमंत कटारे हे काँग्रेस पक्षातील ब्राह्मण चेहरा आहेत.

काँग्रेस नेतृत्वाने मध्य प्रदेशात ज्या प्रकारे बदल घडवून आणले आहेत, त्यावरून पक्षाने आता गटबाजीतून बाहेर पडून, नव्या लोकांना संधी देण्यावर भर दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. मध्य प्रदेशानंतर आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनाही स्पष्ट संकेत देत राजस्थानमध्येही पक्ष फेरबदलाचा निर्णय घेईल, अशी शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com