Rahul Gandhi, Delhi Election Sarkarnama
देश

Delhi Assembly Election Update : दिल्लीत काँग्रेस भाजपच्या विजयासाठी लढली; अखेर मनातलं बाहेर आलं...

Congress Leader Alka Lamba AAP Defeat BJP Won : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. राज्यात 27 वर्षांनंतर भाजपची सत्ता येणार आहे.

Rajanand More

Election Result Live : दिल्लीत काँग्रेस आणि भाजपची छुपी आघाडी असल्याचा आरोप अरविंद केजरीवालांसह आपचे बहुतेक नेते करत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया त्याचेच तर संकेत देत नाहीत ना, असं आता वाटू लागले आहे. त्याबाबत महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व कालकाजी मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार अलका लांबा यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.

भाजप दिल्लीत 27 वर्षांनंतर सत्तेत येणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आपचा दारुण पराभव होणार असून काँग्रेसचा मागील दोन निवडणुकींप्रमाणे या निवडणुकीतही भोपळाही फुटणार नाही. एक मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात पक्षाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. पक्षासाठी ही लाजीरवाणी बाब असली तरी केजरीवालांच्या पराभवात पक्षाचे नेते आनंद शोधू लागले आहेत.

अलका लांबा याही तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे पराभवाच्या छायेत असलेल्या मुख्यमंत्री आतिशी यांना मिळालेल्या मतांच्या त्या जवळपासही नाहीत. पण त्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिलेला नाही. सुरूवातीच्या काही फेऱ्यांतच भाजपने आघाडीत घेतल्यानंतर अलका लांबा यांनी मीडियाला प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

दिल्लीच्या गुन्हेगारांना दिल्ली माफ करणार नाही. तेच होताना दिसत आहे, अशी लांबा यांची पहिली प्रतिक्रिया होती. दिल्लीत काँग्रेस मजबुतीने लढली त्यामुळे भाजपचा विजय होत आहे का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, कुणाचा फायदा, कुणाचे नुकसान हे मला माहिती नाही. पण ज्यांनी दिल्लीचे नुकसान केले त्यांचे नुकसान होताना दिसत आहे.

केजरीवाल, सिसोदियांचा काँग्रेसमुळे पराभव?

अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे नेते सध्या पिछाडीवर आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना मिळालेली मते भाजपच्या मताधिक्यापेक्षा अधिक आहेत. याचा अर्थ काँग्रेसच्या उमेदवारांमुळे या नेत्यांचा पराभव होऊ शकते, असे चित्र आहे. इतर काही मतदारसंघातही तीच स्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसमुळे आपची सत्ता गेली, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT