Karnataka News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस आता लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. लोकसभेच्या राज्यातील २८ पैकी किमान २० जागा जिंकण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. त्याबाबतची रणनीती काँग्रेसकडून आखण्यात आली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी एक वरिष्ठ नेता आणि प्रभारी मंत्र्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. (Congress tactics for Lok Sabha Election; Target to win 20 seats in Karnataka)
दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर कर्नाटक (Karnataka) काँग्रेसचे (Congress) प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जून खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह कर्नाटकातील ३६ नेते उपस्थित होते. या वेळी लोकसभेच्या आगामी निवडणुकीबाबत खल झाला. त्यावेळी मतदारसंघनिहाय एक वरिष्ठ नेता आणि प्रभारी मंत्री नेमण्याचा निर्णय झाला.
आगामी लोकसभा निवडणुकीत (loksabha Election) आपल्याला अधिकाधिक जागा जिंकणे गरजेचे आहे, त्यामुळे सर्व नाराजी आणि असंतोष बाजूला ठेवून काम करा आणि निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचनाही या वेळी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याबाबतही या वेळी चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील काही मंत्र्यांना रिंगणात उतरविण्याबाबत चर्चा झाली आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याची सूचना अशा मंत्र्यांना करण्यात आलेली आहे. पक्षाच्या हितासाठी सर्व त्याग करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना राज्यात आल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.