Assembly Session : जयंत पाटील, आव्हाड आम्हाला तुमचीही चौकशी लावावी लागेल; बच्चू कडूंचा गोड इशारा

Bacchu Kadu : विरोधी पक्षाची जबाबदारी अधिक गंभीरतेने घेण्याची गरज आहे. पुढच्या काळात विरोधी पक्षच राहणार नाही, असे वाटतंय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावर येऊ शकते.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आमदार बच्चू कडू यांच्या भाषणावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील आपापसांत बोलत होते. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यासारखे सदस्य आमच्या भाषणात व्यत्यय आणत असतील तर आम्हाला तुमच्यावरही चौकशी लावावी लागेल, असा गोड इशारा सत्ताधारी आमदार बच्चू कडू यांनी दिला. (Jayant Patil, Jitendra Awhad, we have to investigate you too: Bachu Kadu's sweet warning)

विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) बोलत होते. ते म्हणाले की, विरोधी पक्षाची जबाबदारी अधिक गंभीरतेने घेण्याची गरज आहे. पुढच्या काळात विरोधी पक्षच राहणार नाही, असे वाटतंय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावर येऊ शकते, अशी कोटी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाषणाच्या सुरुवातीला केली

Bacchu Kadu
Vidhansabha News: शिवसेना उबाठा कुठाय?, सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग, शेलार मोठे नाहीत; भास्कर जाधव-शेलार भिडले

राज्यातील विजेच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की तुम्ही शेतकऱ्यांना आठ तास वीज देता आणि चोवीस तासाचे बिल लावता. तसेच, विजेच्या धक्क्याने सर्वसामान्य माणूस आज मरत आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष होते आहे. आमदार, खासदाराचा मुलगा मरत नाही, म्हणून आपण त्याच्या व्यथा जाणून घेत नाही, असे मला वाटतं. सर्वसामान्य मतदाराचं पोरगं मरतंय, त्यामुळे तुम्हाला त्याची कदर नाही. शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या देठालाही हात लागू नये, या विचाराने राज्य चालवत होते. म्हणून निव्वळ छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं, असा टोलाही बच्च कडू यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

Bacchu Kadu
Ajit Dada Vs Jayant Patil: ‘सरकारला आपण किती वाचवणार?’ ‘जयंतराव, ते मला चांगलं माहिती आहे’; अजितदादा-जयंतरावांमध्ये जुगलबंदी

दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला आमदार राम कदम, जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad), वैभव नाईक, जयंत पाटील हे बोलत होते. त्यावेळी जयंत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेते असं करत असतील तर कसं होईल, असा प्रश्न आमदार कडू केला. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड बोलत होते.

Bacchu Kadu
Chandrakant Patil News: ३३ कोटी वृक्षलागवड गैरव्यवहार चौकशी समितीचे अध्यक्ष बदलले; चंद्रकांतदादांकडे जबाबदारी

त्यावेळी बच्चू कडू म्हणाले की, इकडं सभागृह अजून चालूच आहे, अध्यक्ष. तुमचं वजन अजून त्या सदस्यांवर पडलेलं दिसत नाही. एक तर ते तुम्हाला मानत नाहीत वाटतं, असं वाटतंय. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटील (jayant Patil) यांना आसनावर येऊन बसा. या इकडे सांगितले. त्यावर सत्ताधारी बाकाकडून या आपल्या सत्तेत या, असे गुलाबराव पाटील यांनी विधान केले. त्यावर अध्यक्षांनी ‘गुलाबराव तुम्ही चुकीचा अर्थ लावू नका,’ असे स्पष्ट केले. त्यावर बच्चू कडू यांनी ‘चौकशीला घाबरून ते तिकडं जात आहेत, त्याबद्दल धन्यवाद. किमान कळलं कोणाला ना कोणाला तरी घाबरतात, अशी कोटी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com