<div class="paragraphs"><p>Sonia Gandhi - Rahul Gandhi</p></div>

Sonia Gandhi - Rahul Gandhi

 

Sarkarnama 

देश

जरा कळ काढा! काॅंग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष हा नऊ महिन्यांनी मिळणार!

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : पूर्ण शक्तीनिशी प्रत्येक निवडणूक लढणाऱ्या भाजपचा (BJP) सामना करण्यासाठी काॅंग्रेसची (Congress) तयारी अद्याप कशी नाही, हे अनेकदा युपीएतील (UPA) पक्षनेते सांगत असतात. त्यासाठी एवढ्या मोठ्या पक्षाला आपला पूर्णवेळ अध्यक्ष निवडता येत नाही, असे कारण त्यासाठी देत असतात. पक्षाने पूर्ण वेळ अध्यक्ष द्यावा, अशी मागणी पक्षातीलही नेते करत असतात. हा अध्यक्ष कधी मिळणार, याचे उत्तर काॅंग्रेसच्या निवडणूक यंत्रणेचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काॅंग्रेसच्या निवडणुकीचे वेळापत्रक लक्षात घेतले तर पुढील वर्षाच्या सप्टेंबरमध्ये पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

मिस्त्री यांनी एएनआयशी बोलताना ही मुदत सांगितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काॅंग्रेस कार्यकारिणीने तसे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसारच या निवडणुका पार पडतील. ब्लाॅक स्तरापासून ते राष्ट्रीय पातळीवर या निवडणुका होणार आहेत. त्याशिवाय पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळणे अवघड होणार आहे. याचाच अर्थ उत्तर प्रदेश, पंजाब या महत्वाच्या राज्यांत होणाऱ्या आगामी निवडणुकांत सोनिया गांधी यांनाच अध्यक्ष म्हणून लक्ष घालावे लागणार आहे.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर बराच काळ पक्ष हा अध्यक्षाविना होता. कालांतराने सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी पद देण्यात आले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी मागणी केली होती. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. राहुल गांधी हे अद्याप अध्यक्ष होण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही निवड लांबणीवर पडत असल्याची चर्चा पक्षांच्या नेत्यांत आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही काॅंग्रेसच्या अशा निर्णायकी अवस्थेबद्दल टीका केली होती. जो पक्ष आपला अध्यक्ष निवडू शकत नाही, तो भाजपशी कसा काय लढा देणार, असा सवाल त्यांनी विचारला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT