नितेश राणे कुठे आहेत हे माहिती असले तरी मी सांगणार नाही

संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे नॉट रिचेबल आहेत
नितेश राणे 

नितेश राणे 

Published on
Updated on

मुंबई : नितेश राणे कुठे आहेत, हे मला माहिती आहे, पण ते मी तुम्हाला सांगणार नाही, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप आमदार नितेश राणे कुठे आहेत हे सांगण्यास स्पष्ट नकार दिला आहे. परबवर वर हल्ला करणारा नक्की नितेशच होता का, असा सवालही त्यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र काल सायंकाळपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. सिंधुदुर्ग पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यापुर्वी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

<div class="paragraphs"><p>नितेश राणे&nbsp;</p></div>
नितेश राणे नॉट रिचेबल; अटकेची शक्यता,पोलिस पथके गोव्यात

शिवसेनेकडून सत्तेचा, प्रशासनाचा दुरुपयोग होत आहे. जिल्हा बॅंकेतील पाप लपवण्यासाठी शिवसेनेकडून असे कट रचत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, एवढा असा कोणता गुन्हा केला नितेश राणेंनी की त्यांना पकडण्यासाठी कणकवलीत एवढा मोठा पोलिस फौजफाटा कशासाठी तैनात करण्यात आला आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच मी देखील केंद्रात मंत्री आहे. मला काही फरक पडत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आणि करंजे गावचे माजी सरपंच आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने परब यांच्यावर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले. परब यांनी आपल्यावरील हल्ल्याला नितेश राणे यांचे नाव घेतले. त्यानंतर या हल्ल्याच्या तपासाची मागणी शिवसेनेने लावून धरली. तसेच या प्रकरणाला राजकीय शत्रुत्वाच्या संशयावरून नितेश राणे यांच्यासह आणखी काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com