Delhi News : लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने देशाचे राजकीय वातावरण गरम होण्यास सुरूवात झालेली आहे. याची प्रचिती संसदेच्या अधिवेशानातच आलेली आहे. आता काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने टीका करताना भाजप आणि भाजपला मतदान करणाऱ्यांना राक्षस म्हटले आहे. यावरून देशात भाजप-काँग्रेसमध्ये नव्या वादाला सुरूवात झालेली असून भाजपकडून काँग्रेसचा खरपूस समचार घेतला जात आहे. यावर आता काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. (Latest Political News)
हरियाणातील कैथलमध्ये काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांनी भाजपबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुरजेवाला यांनी रविवारी भाजप आणि त्यांच्या समर्थकांना 'राक्षस' म्हटले आहे. कैथलमध्ये काँग्रेसच्या 'जन आक्रोश रॅली'त सुरजेवाला म्हणाले, "नागरिकांना नोकऱ्या देऊ नका, किमान नोकरीत बसण्याची संधी द्या. भाजप आणि भाजपचे लोक 'राक्षस' आहेत. जे लोक भाजपला मतदान करतात आणि पाठिंबा देतात तेही 'राक्षस' आहेत. आज मी या महाभारत भूमीला शाप देतो."
काँग्रेस पक्ष आणि सुरजेवाला यांच्यावर टीका करताना भाजपने म्हटले की, एकीकडे मोदी आहेत, १४० कोटी देशवासीयांचे पंतप्रधान आहेत, ज्यांच्यासाठी जनता जनार्दन आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष आहे, ज्यांच्यासाठी जनता राक्षस आहे. हा फरक जनतेला चांगलाच कळतो.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले की, "राजकुमार यांना लॉन्च करण्यात वारंवार अपयशी ठरलेल्या काँग्रेसने जनतेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. सुरजेवाला म्हणातात देशातील जनता जे भाजपला मत देतात आणि पाठिंबा देतात ते 'राक्षस' आहेत. कोण राक्षस आहे हे लोकांना समजले आहे. जनता त्यांच्या द्वेषाच्या 'मेगा शॉपिंग मॉल'ला टाळे लावण्याचे काम करेल."
भाजपचे नेते काँग्रेस आणि सुरजेवाला यांच्यावर सडकून टीका करू लागले आहेत. "कोणत्याही पक्षाला मतदान करणे किंवा पाठिंबा देणे हा नागरिकाचा अधिकार आहे हे समजून घ्या. तुम्ही तुमच्या भाषेने आणि विचाराने देशद्रोही आहात. रणदीप सुरजेवाला आणि त्यांचा पक्ष अफझल गुरू, ओसामा आणि हाफिज सईदचा उल्लेख 'जी' आणि 'साहेब' करत होता. पण आता ते मतदारांना शिव्या देत आहेत. भाजपला २२.९ कोटी मतदारांनी मतदान केले आहे. आधी निवडणूक आयोगाबाबत खोटी विधाने करतात, 'ईव्हीएम'च्या गैरवापराचे आरोप करतात आणि आता जनतेत अविश्वास निर्माण करतात? जनता त्यांना धडा शिकवेल!" अशा शब्दात भाजप नेते काँग्रेसचा समाचार घेत आहेत.
विधानानंतर सुरजेवालांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. या विधानामुळे देभभरातील भाजपचे कार्यक्रर्ते आक्रमक झाले आहेत. या विधानाने भाजप-काँग्रसमध्ये वादाची नवी ठिणगी पडली असून याचा वनवा पेटण्याची शक्यता आहे. या विधानाने काँग्रेसला बॅकफूटवर जाण्याची वेळ येऊ शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यावर काँग्रेस काय भूमिका घेते, याकडे लक्ष लगले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.