Attack on Asaduddin Owaisi's house : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील अशोका रोडवरील शासकीय निवासस्थानावर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाल्याचा दावा ओवैसींनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास काही अज्ञातांनी ओवैसींच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थावर दगडफेक केली. सुदैवाने यावेळी ओवैसी घरात नव्हते, पण घरातील सहाय्यकाने सर्व प्रकार पाहिल्यानंतर फोन करून पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या घराबाहेर फेकलेले दगड आणि खिडक्यांच्या फुटलेल्या काचा पसरल्या होत्या.
या हल्ल्याचा निषेध करताना ओवैसी म्हणाले, आपण उद्या स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत आणि तुम्ही देशाला असा संदेश देताय. हरियाणातील नुंहमधील मुस्लिमांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, महात्मा गांधींनी स्वत: नुंहमध्ये जाऊन तेथील मुस्लिमांना पाकिस्तानात न जाण्याची विनंती केली होती. त्या मुस्लिमांशी तुम्ही असं वागता.ठिक आहे तिथे हिंसाचार झाला त्याचा मी निषेधच करतो, पण तुम्ही एका समुदायाला संघटितरित्या शिक्षा का देत आहात,त्यांच्या घरावर बुलडोझर का फिरवत आहात, आता कुठे गेला पंतप्रधानांचा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास... कुठे गेले ते लोक जे आरएसएस"शी चर्चा करू बोलले होते, आता चर्चा करा, जे असं बोलतात त्यांनी नुंहला जाऊन तिथली परिस्थिती एकदा डोळ्यांनी पाहिली पाहिजे.
पंतप्रधानांच्या हृदयात देशातील मुस्लिमांबद्दल थोडे जर प्रेमभावना असतील तर उद्या लाल किल्ल्यावरून ते अशा नियोजित हल्ल्यांचा निषेध करतील. किमान देशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा तरी त्यांनी निषेध करावा, एका ठराविक समुदायाला लक्ष्य करणाऱ्यांचा त्यांनी निषेध करावा, निवडणुकांच्या आधी त्यांचं हे शेवटचं भाषण असेल, बघुयात पंतप्रधान या हिंसाचाराचा निषेध करतात की नाही,असही ओवैसींनी थेट पंतप्रधानांनाच आव्हान दिलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.