Rahul Gandhi Sarkarnana
देश

Gruha Lakshmi Scheme Karnataka : जाहीरनाम्यात दिलेलं वचन काँग्रेस पूर्ण करणार ; राहुल गांधींच्या हस्ते होणार योजनेचा शुभारंभ

अनुराधा धावडे

Karnataka News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात अनेक आश्वासने दिली होती. त्यातील एक आश्वासन आज पूर्ण करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य सरकार आज म्हैसूरमध्ये गृहलक्ष्मी योजना सुरू करणार आहे. त्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी दिल्लीहून कर्नाटकला रवाना झाले आहेत.

"काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकार महिलांसाठी जगातील सर्वात मोठी कल्याणकारी योजना - गृह लक्ष्मी योजना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत म्हैसूरमध्ये सुरू करणार आहे," असे पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ट्विट केले.

काय आहे गृहलक्ष्मी योजना?

गृहलक्ष्मी योजनेंतर्गत एक कोटीहून अधिक घरांच्या महिला प्रमुखांच्या खात्यात दरमहा दोन-दोन हजार रुपये जमा केले जातील. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जनतेला या योजनेचे आश्वासन दिले होते. काँग्रेसच्या पाच निवडणूकपूर्व आश्वासनांपैकी हे एक आश्वासन आहे.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते, किमान 1.1 कोटी कुटुंबांच्या महिला प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये दिले जातील. सरकारने चालू आर्थिक वर्षात 'गृहलक्ष्मी' कार्यक्रमासाठी 17,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सरकार या योजनेची अंमलबजावणी करू शकणार नाही आणि त्यामुळे आर्थिक दिवाळखोरी होईल, असा आरोप विरोधी पक्ष करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. पण आम्ही त्यांची यशस्वी अंमलबजावणी करत आहोत. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या शुभारंभासाठी सुमारे एक लाख लोक सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. असंहीतही सिद्धारामय्या यांनी नमुद केलं.

या वर्षी मे महिन्यात कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सरकार स्थापन झाल्यानंतर प्रत्येक घरातील एका गृहिणीला दरमहा 2000 रुपये देऊ, असे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते.

आज राहुल गांधी या योजनेचे उद्घाटन करतील तेव्हा लगेचच या योजनेसाठी नोंदणी केलेल्या 1,09,54,000 महिलांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील. ज्या महिलांच्या नावावर शिधापत्रिका आहे, त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आयकर भरणारी महिला किंवा तिचा पती या योजनेसाठी पात्र असणार नाही. आधी हा कार्यक्रम 20 ऑगस्टला बेळगावमध्ये होणार होता, पण तो 27 ऑगस्टला पुढे ढकलण्यात आला. नंतर राहुल गांधींचा म्हैसूर दौरा निश्चित झाल्यावर कार्यक्रमाची तारीख ३० ऑगस्ट आणि म्हैसूर स्थळ निश्चित करण्यात आली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT