BJP and Congress  Sarkarnama
देश

मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारताच काँग्रेसनं टाकणार मोठा डाव!

सरकारनामा ब्युरो

डेहराडून : उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात भाजपने (BJP) सत्ता मिळवली आहे. पुन्हा एकदा पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री (Chief Minister) पदाची माळ पडली आहे. असे असले तरी धामी यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून यावे लागेल. यासाठी त्यांनी चंपावत मतदारसंघाची निवड केली आहे. यानंतर काँग्रेसनंही (Congress) आक्रमकपणे पावले उचलत धामींना हरवण्यासाठी मोठा डाव टाकला आहे.

धामींनी निवडलेल्या चंपावत मतदारसंघात भाजपला या विधानसभा निवडणुकीत 50.26 टक्के मते मिळाली होती. या मतदारसंघात भाजपच्या कैलाश गहतोडी यांनी काँग्रेसच्या हेमेश खार्कवाल यांच्या 5 हजार 304 मतांनी पराभव केला होती. गहतोडी यांनी 32 हजार 547 आणि खर्कवाल यांना 27 हजार 243 मते मिळाली होती. या जागेवर जिंकणारा पक्ष राज्यात सत्ता मिळवतो, असे बोलले जाते. येथे 2002 पासून झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांचा विचार करता तीन वेळा भाजप आणि दोन वेळा काँग्रेसचा विजय झाला आहे. आता या जागेवर मुख्यमंत्र्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं डाव टाकण्याची तयारी केली आहे. या जागेवर तगडा उमेदवार देण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे. यामुळे धामींच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

धामी यांच्यासाठी काही दिवसांपासून मतदारसंघाची निवड सुरू होती. अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली होती. यात चंपावतचे आमदार कैलाश गहतोडी यांचाही समावेश होता. अखेर पक्षनेतृत्वाने चंपावतवर शिक्कामोर्तब केले आहे. चंपावत हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे धामी यांच्या विजयाची भाजपला खात्री आहे. याबरोबर धामी यांनाही पुन्हा पराभवाची नामुष्की सहन करावी लागणार नाही. गहतोडी यांनी विधानसभा अध्यक्षा ऋतू खांडुरी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. परंतु, त्यांचा खातिमा मतदारसंघात पराभव झाला होता. असे असले तरी ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि ज्येष्ठ नेते सत्पाल महाराज हे शर्यतीत होते. या चौघांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री निवडीसाठी आमदारांची बैठक पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि पक्षाच्या नेत्या मीनाक्षी लेखी या केंद्रीय निरीक्षक म्हणून बैठकीला हजर होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी धामी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT