रश्मी शुक्लांचा फंडा! फोन टॅपिंगसाठी राऊतांचं 'रहाटे' तर खडसेंचं 'खडसणे' नामकरण

फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस रश्मी शुक्ला या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.
Sanjay Raut, Eknath Khadse
Sanjay Raut, Eknath KhadseSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या फोन टॅपिंगबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी या अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी सहा अधिकाऱ्यांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले आहेत. शुक्लांनी फोन टॅपिंगसाठी राऊतांचे एस.रहाटे तर खडसेंचे खडसणे असे नामकरण केल्याचेही उघड झाले आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 164 नुसार हे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि उपअक्षीधक दर्जाचा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपअधीक्षक असलेले हे अधिकारी गुप्तवार्ता विभागात कार्यरत होते आणि त्यांना फोन टॅपिंगची माहिती होती. फोन टॅपिंगसाठी संजय राऊत यांचे नामकरण एस.रहाटे आणि एकनाथ खडसे यांचे खडसणे असे नामकरण करण्यात आले होते, असेही या अधिकाऱ्यांच्या जबाबातून उघड झाले आहे.

Sanjay Raut, Eknath Khadse
केंद्रीय मंत्री राणेंची अटक टळली! उच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांना समाज विघातक नमूद करून त्यांचे फोन टॅप करण्यात आले. गुप्तवार्ता विभागाने गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रातून हे समोर आले आहे. यामध्ये आणखी काही जणांची नावे असून त्यांनाही समाज विघातक म्हटलं आहे. या पत्रानंतरही गुप्तवार्ता विभागाला फोन टॅपिंगसाठी (Phone Tapping) परवानगी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Sanjay Raut, Eknath Khadse
धनंजय मुंडेंना धमकावणं महागात! मेव्हणीचा मुक्काम थेट पोलीस कोठडीत

गृह विभागाने परवानगी दिल्यानंतर एकनाथ खडसे यांचा फोन 67 दिवस तर संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी गृहखात्याची परवानगी घेताना आमचे नंबर देताना आम्ही समाज विघातक आहोत ड्रग पेडलर आहोत, माफिया आहोत, असं सांगून परवानगी घेतली. आमचे फोन टॅपिंग केले. यामध्ये मी, एकनाथ खडसे, नाना पटोले आहेत. आमचे फोन भाजपने टॅप केले, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com