Rahul Gandhi Sarkarnama
देश

Himani Narwal Murder Case News : भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्याबरोबर चालणाऱ्या महिला नेत्याची हत्या; सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

Rohtak Congress Leader Murder Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या तसेच ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या रोहतकच्या नेत्या हिमानी नरवाल यांची हत्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने हरियाणात खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

Rohtak News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय आणि ‘भारत जोडो’ यात्रेत त्यांच्याबरोबर चाललेल्या महिला नेत्याची हत्या करण्यात आली आहे. हरियाणा येथील रोहतकमध्ये ही घटना घडली असून काँग्रेस महिला नेत्याचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने रोहतसह हरियाणात एकच खळबळ उडाली आहे. हिमानी नरवाल असे महिला नेत्याचे नाव असून त्या हरियाणा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय होत्या.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत अनेक मोठे चेहरे सहभागी झाले होते. अनेकांचे फोटोही व्हायरल झाले होते. तर याच फोटोंवरून भाजपने राहुल गांधींना घेरले होते. असाच एक फोटो हिमानी नरवाल यांचा व्हायरल झाला होता. जो ‘भारत जोडो’ यात्रेतील राहुल गांधी यांच्यासोबतचा होता. हिमानी नरवाल हरियाणा काँग्रेसच्या युवती नेत्या होत्या. त्यांच्या समाज माध्यमांवर त्यांनी अनेक नेत्यांसोबतची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. पण आता त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले असून सुटकेसमध्ये सापडला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

रोहतकमधील सांपला येथून जाणाऱ्या फ्लायओव्हर जवळ हा मृतदेह दिसून आला. एका बंद सुटकेसमध्ये हाताला मेहंदी असलेल्या तरुणीचा मृतदेह मिळाल्याने एक खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांना सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली होती. पण लगेच काही या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.

तसेच मृतदेहाची ओळख पटावी म्हणून रोहतक पीजीआयमध्ये तिचा मृतदेह ठेवला होता. यादरम्यान पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांचा तो मृतदेह असल्याचे उघड झाले आहे. तर हिमानी नरवाल यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे समलखा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बिजेंद्र सिंह यांनी सांगितले.

‘भारत जोडो’ यात्रे वेळी हिमानी हरयाणवी पेहरावात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोटोही काढला होता. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर हरियाणा विधानसभा निवडणुकीत हिमानी यांनी रोहतकमध्ये दीपेंद्र हुड्डा आणि भूपेंद्र हुड्डा यांच्यासाठी प्रचारही सक्रीय होत्या.

हिमानी यांच्या हत्याच्या घटनेनंतर आता रोहतकसह हरियाणात खळबळ उडाली आहे. तर हिमानी या काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्ता असून त्यांच्या हत्येची चौकशी एसआयटी मार्फत करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार बीबी बत्रा यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT