Goa Politics 2025: देशात काँग्रेसची वाताहत होत असतानाच गोव्यात देखील काँग्रेसच्या 8 नेत्यांनी गद्दारी केली होती. या 8 जणांना काँग्रेसची दारं कायमच बंद झाल्याचे सांगत गोवा राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे कडाडले.
तसेच या काँगेस पक्षाशी गद्दारी करून भाजपमध्ये गेलेल्या ‘त्या’ आठ गद्दारांना पुन्हा कधीही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितल्याचे राज्यात एकच चर्चेचा विषय सुरू झाला आहे. दरम्यान ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत अन्य पक्षाशी युती करण्याच्या प्रश्नावर देखील भाष्य करणे टाळले आहे. ते मडगावात येथे रविवारी (ता.6) कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मडगाव काँग्रेस गट समितीतर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा, सेवा दलाचे अध्यक्ष राजन घाटे, मडगाव गट काँग्रेसचे संयोजक सावियो कुतिन्हो व राधा कवळेकर उपस्थित होते.
यावेळी ठाकरे यांनी, काँगेस पक्षाशी गद्दारी करून भाजपमध्ये गेलेल्या ‘त्या’ आठ नेत्यांवर जोरदार टीका केली. तर त्या आठ जणांना गद्दार म्हणत त्यांना पुन्हा कधीहीच पक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केलं.
तर गोव्यात काँग्रेसच्या मजबूतीसाठी कार्यक्रम आखण्यात येणार असून आगामी निवडणुकीसाठी तयारी केली जातेय. याच अनुशंगाने मतदार व पक्षाच्या कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन युती बाबत पुढील पावले उचलली जातील, असेही संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत.
यावेळी दिगंबर कामत यांच्यावर तोफ डागताना ठाकरे म्हणाले, त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्री बनविले. पण त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. यामागे केवळ त्यांचा स्वार्थ होता. पद व भ्रष्टाचार हीच त्यांची नीती आहे. मडगावातून त्यांना नक्कीच पराभूत केले जाईल. पक्षाचा उमेदवार हा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निवडला जाईल. तो आता दिल्लीतून नाही तर येथून निवडला जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.
आठ आमदारांनी गद्दारी करून भाजपमध्ये ते गेले. गोव्याच्या राजकीय इतिहासातील तो एक काळा दिवस होता, असे अमित पाटकर म्हणाले. दिगंबर कामत मडगावच्या विकासासाठी भाजपत गेल्याचे सांगत असतात. मात्र ते जाऊनही मडगावात बसस्टँड होत नाही, यालाच विकास म्हणायचा का? असाही सवाल पाटकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
सावियो डिसिल्वा यांनी, काँग्रेसच्या मजबूतीसाठी गट समिती बळकट करणार असून मडगावात सध्या बजबजपुरी माजल्याचा दावा केला. या बजबजपुरीला लोक त्रासले असून रावणफोंड पुलासाठी 54 कोटी खर्च दाखवितात. रिंग रोड होत नसल्याचा आरोप देखील सावियो डिसिल्वा यांनी यावेळी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.