BJP MP Lallu Singh Sarkarnama
देश

Constitution News : नवीन संविधानासाठी हवेत दोन तृतियांश खासदार! भाजप खासदार थांबेनात, पुन्हा वादग्रस्त विधान

Rajanand More

Uttar Pradesh News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपुर्वीच एका प्रचारसभेत भारतीय संविधानाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर परत आले तर ते संविधान बदलू शकत नाहीत, असे ते म्हणाले होते. पण आज आंबडेकर जयंतीदिनीच भाजप नेत्याच्या संविधान बदलण्याबाबतच्या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. संविधानात (Constitution News) बदल करण्यासाठी किंवा नवीन संविधानासाठी दोन तृतीयांश खासदार हवे असल्याचे विधान या नेत्याने केलं आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फैजाबादचे खासदार आणि भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांचा याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विरोधकांनीही एक्स हँडलवर हा व्हिडीओ शेअर करत सत्ताधारी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

लल्लू सिंह यांनी म्हटले आहे की, ‘सरकार तर 272 खासदारांनीच बनते, पण 272 चे सरकार संविधानात (Indian Constitution) बदल करू शकत नाही. संविधानात बदल करण्यासाठी किंवा नवीन संविधानासाठी दोन तृतियांश जागांची गरज असते.’ लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हे विधान आल्याने भाजपची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सिंह यांचा हा व्हिडीओ एक्स हँडलवर पोस्ट करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपला जनतेची सेवा करण्यासाठी नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्यासाठी विजय हवा आहे. भाजप आरक्षण आणि संविधान संपवू इच्छित आहे. त्यामुळे जनता त्यांचा पराभव करेल.

काँग्रेसकडूनही भाजवर टीका करण्यात आली आहे. पक्षाचे नेते पवन खेडा म्हणाले, मोदींनी म्हटले होते की आंबेडकर आले तरी ते संविधान बदलू शकत नाहीत. आता अयोध्येतील भाजपचे विद्यमान खासदार उघडपणे संविधान बदलण्यासाठी 400 जागा जिंकायला हव्यात, असे बोलत आहेत. मोदी यांना मनापासून माफ करू शकतील?, असा सवालही खेडा यांनी केला आहे.

संविधान बदलण्याची भाषा करणारे भाजपचे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांचे तिकीट पक्षाने कापले आहे. त्यांनीही संविधान बदलण्यासाठी 400 पार खासदार हवे असल्याचे विधान केले होते. पक्षाने त्यांना नोटीसही पाठवली होती. त्यानंतर तिकीट कापून इतर नेत्यांना सुचक संदेशही दिला. पण त्यानंतरही भाजप नेत्यांकडून संविधान बदलण्याबाबतची वक्तव्यं केली जात आहेत.  

संविधान बदलण्याची भाषा करणारे भाजपचे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांचे तिकीट पक्षाने कापले आहे. त्यांनीही संविधान बदलण्यासाठी 400 पार खासदार हवे असल्याचे विधान केले होते. पक्षाने त्यांना नोटीसही पाठवली होती. त्यानंतर तिकीट कापून इतर नेत्यांना सुचक संदेशही दिला. पण त्यानंतरही भाजप नेत्यांकडून संविधान बदलण्याबाबतची वक्तव्यं केली जात आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT