Pooja Khedkar Sarkarnama
देश

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्याकडून सरकारी आदेशाला केराची टोपली; डेडलाईन संपली, कारवाई अटळ?

Rajanand More

New Delhi : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीमध्ये हजर राहण्याचे आदेश त्यांनी पाळले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार, अशी दाट शक्यता आहे.

खेडकर यांना कोणत्याही परिस्थितीत 23 जुलैपर्यंत मसूरी येथील अकादमीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यासाठी त्यांचे ट्रेनिंगही स्थगित करण्यात आले. त्यानंतर त्या वाशिममदून पुण्यात आल्या. मात्र, मसुरी येथे दिलेल्या मुदतीत उपस्थित झाल्या नसल्याचे समोर आले आहे.

युपीएससीमार्फत निवडीसाठी खेडकर यांनी दिव्यांग तसेच क्रीमिलेअरचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा वाद समोर आल्यानंतर त्यांचे ट्रेनिंग थांबवण्यात आले. तसेच यूपीएससीनेही त्यांच्याविरोधात दिल्लीत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.

एवढेच नव्हे तर यूपीएससीने खेडकर यांना नोटीस बजावून निवड का रद्द करू नये, पुढील परीक्षा देण्यास मज्जाव का करू नये, अशी विचारणा केली आहे. त्यातच आता खेडकर यांनी प्रशिक्षण अकादमीमध्ये उपस्थित न राहून वादात भर घातल्याचे बोलले जात आहे. अकादमीकडून आता काय पाऊल उचलले जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना खेडकर यांनी येथील कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक दिली नाही. ऑडी गाडीला अंबर दिवा लावून महाराष्ट्र शासनही गाडीवर लिहिले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. त्यानंतर त्यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. त्यानंतर खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT